Southwest Airlines Viral Video : गेल्या काही वर्षांपासून हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. फ्लाईटमध्ये प्रवास करण्याचा अनुभव अनेकांसाठी सुखद असतो. सध्याच्या सोशल लाईफमुळे कोणतीही घटना लपून राहत नाही. विमानातील काही व्हिडीओ (Viral Video) देखील समोर येतात, जे सोशल मीडियावर अनेकदा पाहिले जातात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. एका फ्लाईटमध्ये एका महिलेने चक्क अप्पर बर्थमध्ये म्हणजे सामना ठेवण्याच्या जागेवर जाऊन निवांत झोप (Airlines passenger climbs into bin) घेतली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संबंधित घटना  साउथवेस्ट एअरलाइन्सचे असल्याचं सांगण्यात येत आहे. 'न्यूयॉर्क पोस्ट'च्या रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ पहिल्यांदा टिकटॉकवर पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये दिसतंय की एक महिला आरामात अप्पर बर्थमध्ये म्हणजेच सामानाच्या डब्यात आरामात झोपलेली दिसत आहे. महिलेला सीटवर झोप येत नव्हती म्हणून महिलेने असा जुगाड केल्याचं पहायला मिळालं. महिला नक्की कोण होती? याबाबत अद्यार खुलासा झाला नाहीये. 


महिलेच्या या पराक्रमामुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दोन तरुणांनी आपल्या मोबाईलमध्ये ही घटना कैद केली अन् सोशल मीडियावर शेअर केली. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी महिलेच्या जुगाडाचं कौतूक केलंय. तर काहींनी एअरलाईन्स कंपनीला दोषी ठरवलं आहे. महिलेने असं धाडस करायला नको होतं, असं काही जणांनी सल्ला दिला आहे.


पाहा Video



दरम्यान, एअरलाइन्स कंपनीने या व्हिडिओवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या वर्षी जिब्राल्टरहून स्पेनला जाणाऱ्या रायनएअरच्या फ्लाइटमध्ये एक प्रवासी सामानाच्या डब्यात झोपलेला आढळला होता. त्यावरून देखील मोठा वाद झाला होता. अशातच आता महिलेचा व्हिडीओ समोर आल्याने अनेकांनी कारवाईची मागणी केली आहे.