नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देश लॉकडाऊन केल्याची घोषणा केली. मात्र, यानंतरही अनेक लोक रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत देऊनही लोक ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे प्रशासनापुढे मोठा पेच उभा राहिला आहे. त्यामुळे आता जगातील अन्य देशांप्रमाणे भारतातही कठोर नियम लागू करावेत, असा मतप्रवाह पुढे येताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगात सध्या स्पेनमधील नियम अत्यंत कठोर आहेत. स्पेन १४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात घरातून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांकडून मोठा आर्थिक दंड आकारण्यात येत आहे. पहिल्यांदा नियम तोडल्यास नागरिकांना दंडापोटी ६०१ युरो (तब्बल ५० हजार) मोजावे लागत आहेत. संबंधित व्यक्ती दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन करताना आढळून आली तर त्यांना तब्बल ६००००० युरोचा (पाच कोटी) दंड भरावा लागत आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत ३० हजार लोकांकडून अशाप्रकारचा दंड वसूल करण्यात आला आहे. 


हे पाहा, मोदीही पाळतायंत सोशल डिस्टन्सिंग


तर चीनपाठोपाठ कोरोना विषाणूने सर्वाधिक हाहा:कार माजवलेल्या इटलीमध्येही नियम तोडणाऱ्यांकडून आर्थिक दंड आकारला जात आहे. ही रक्कम स्पेनच्या तुलनेत बरीच कमी आहे. इटलीत लॉकडाऊनच्या काळात घरात विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना ३००० युरोचा (२.४७ लाख) दंड केला जात आहे. 


लॉक डाऊन म्हणजे काय? वाचा यादरम्यान होणारे महत्त्वाचे बदल


भारतात सध्याच्या घडीला लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्यांसाठी अशा कोणत्याही आर्थिक दंडाची तरतूद नाही. नियम तोडणाऱ्यांविरुद्ध केवळ गुन्हे दाखल केले जात आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ५३६ वरो पोहोचला आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ६९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत देशभरात १० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.