चीनच्या जाळ्यात असा फसला Sri lanka, आता दिवाळखोरीच्या मार्गावर
Sri lanka economic crisis : भारताचा शेजारील देश श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. चीनने त्याला आपल्या जाळ्यात फसवलं आहे.
Sri lanka Crisis : श्रीलंकेत परिस्थिती बिकट होत चालली आहे. सर्वसामान्य लोकांना याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. अनेक लोकं तर आता देश सोडून भारतात येण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. इंधनापासून सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने आर्थिक संकटात (Economic Crisis) सापडलेल्या लोकांपुढे वाढत असलेल्या महागाईन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण श्रीलंकेवर आज ही परिस्थिती का ओढवली. याचे देखील विश्लेषण होणं गरजेचं आहे.
आज चीनचे कर्ज (China's debt) फेडताना श्रीलंकेचे कंबरडे मोडले आहे. चीनकडून आधीच हंबनटोटा बेट गमावलेल्या श्रीलंके पुढे दिवाळखोरी होण्याचा धोका आहे. देशातील परकीय चलनाचा साठा एका दशकातील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. चीनचे श्रीलंकेवर ५ अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. गेल्या वर्षी, देशातील आर्थिक संकटावर मात करण्यासाठी चीनकडून आणखी 1 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले. पुढील 12 महिन्यांत देशाला देशी आणि विदेशी कर्ज फेडण्यासाठी सुमारे $7.3 अब्ज डॉलरची गरज आहे. $500 दशलक्ष किमतीचे आंतरराष्ट्रीय सार्वभौम रोखे जानेवारीमध्ये भरायचे आहेत. नोव्हेंबरपर्यंत, देशातील परकीय चलनाचा साठा केवळ $1.6 अब्ज होता.
श्रीलंकेने चीनकडून कर्ज घेतलेले काही पायाभूत प्रकल्प रखडले. श्रीलंकेने दक्षिण श्रीलंकेतील हंबनटोटा (Hambantota) येथे बंदर बांधण्यासाठी चीनकडून $1.4 बिलियनचे कर्ज घेतले होते, परंतु ते कर्ज फेडू शकले नाही. अखेर 2017 मध्ये ते 99 वर्षांच्या भाडेतत्त्वावर एका चिनी कंपनीकडे ते सुपूर्द करण्यात आले. चीनकडून मिळणारी सुलभ कर्जेही त्यासाठी अडचणीची ठरली आहेत. श्रीलंकेची आर्थिक स्थिती चीनचे कर्ज फेडण्याइतकी मजबूत नाही. आता तो पुन्हा चीनकडून २.५ अब्ज डॉलरचे कर्ज घेण्याची तयारी करत आहे.
जगभरातील तज्ज्ञ जेव्हा चीनच्या कर्ज सापळ्याच्या धोरणाबद्दल सांगतात, तेव्हा त्यात श्रीलंकेचा समावेश उदाहरण म्हणून केला जातो. याशिवाय श्रीलंकेने भारत (India) आणि जपान (Japan) सारख्या देशांकडून आणि IMF सारख्या संस्थांकडूनही कर वसूल केला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल २०२१ पर्यंत श्रीलंकेवर एकूण ३५ अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज (Foreign debt) होते.
आर्थिक तंगी आणि अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे, श्रीलंकेच्या जाफना (Jaffna) आणि मन्नार (mannar) प्रदेशातून श्रीलंकन तामिळ लोकं तमिळनाडूत (Tamilnadu) येत आहेत. येत्या काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेत सध्या तांदूळ (Rice price) आणि साखर (Suger) 290 रुपये किलो दराने विकली जात आहे. 400 ग्रॅम दूध पावडरची किंमत 790 रुपये आहे. गेल्या तीन दिवसांत दूध पावडरच्या दरात 250 रुपयांनी वाढ झाली आहे. श्रीलंका सरकारने पेपर्सच्या कमतरतेमुळे शालेय परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत.