Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील परिस्थिती अनियंत्रित होत आहे. आर्थिक संकटाला अडकलेल्या सरकारचा विरोध अधिक उग्र होत चालला आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी आता देशाच्या संसद भवनाकडे कूच केले. संसद भवनात हजारो आंदोलक जमले आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी लष्कर आणि पोलिसांची संयुक्त कारवाई होताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेत आंदोलक संतप्त


श्रीलंकेत निदर्शने वाढत असताना, संसदेच्या अध्यक्षांनी सांगितले की, गोटाबाया राजपक्षे बुधवारी औपचारिकपणे आपल्या पदाचा राजीनामा देतील. मात्र ते देश सोडून पळून गेल्यानंतर हजारो आंदोलकांनी राष्ट्रपती भवनानंतर विक्रमसिंघे यांच्या कार्यालयावर धडक दिली. राजपक्षे यांनी बुधवारी विक्रमसिंघे यांना त्यांच्या अनुपस्थितीत हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.


श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोसळली?


श्रीलंकेच्या सर्वात महत्त्वाच्या पर्यटन क्षेत्राला 2019 मध्ये प्रथमच फटका बसला जेव्हा तेथील चर्च आणि हॉटेल्सवर इस्लामिक अतिरेक्यांनी हल्ले केले. यानंतर, कोरोना महामारीने श्रीलंकेच्या पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का दिला. सरकारी कर कपातीमुळे त्याची तिजोरी आणखी कमी झाली. श्रीलंकेत औषधांपासून अन्न आणि इंधनापर्यंत सर्व काही आयात करण्यासाठी लागणारे परकीय चलन शून्यावर आले.


श्रीलंकेतील लोकांवर कसा झाला परिणाम?


श्रीलंकेला अनेक महिने औषध आणि अन्नधान्य टंचाई आणि ब्लॅकआउटचा सामना करावा लागला. रशिया आणि इतरांकडून अनुदानित तेलाची विनंती करूनही त्यांना पेट्रोल आणि डिझेल मिळत नाहीये. त्यामुळे श्रीलंकेतील महागाई गगनाला भिडली. महागाईच्या बाबतीत श्रीलंका झिम्बाब्वेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेला गंभीर संकटाचा सामना करावा लागत असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, श्रीलंकेतील तीन चतुर्थांश लोकसंख्येने अन्नाअभावी त्यांचा आहार कमी केलाय.