कोलंबो : मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेला पूर यामुळे झालेल्या भूस्खलनामुळे श्रीलंकेत ९१ जणांचा मृत्यू झालाय. तर ११० हून अधिक जण बेपत्ता झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पूराचा फटका देशातील २० हजार नागरिकांना बसलाय. गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत देशात ३०० ते ५०० मिमी पावसाची नोंद झालीय. काही भागात तर ६०० मीमी पाऊस बरसलाय. 


पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी श्रीलंकेचं हवाईदल आणि नौदल शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. दरम्यान श्रीलंकेवर ओढावलेल्या या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी भारतानं मदतीचा हात पुढे केलाय.


अत्यावश्यक साधन सामुग्री असलेली दोन जहाजं भारतानं श्रीलंकेला पाठवलीत. यातलं एक जहाज आज कोलंबोमध्ये दाखल होईल तर दुसरं जहाज उद्या दाखल होणार आहे. श्रीलंकेतील नागरिकांवर ओढावलेल्या या नैसर्गिक आपत्तीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दु:ख व्यक्त केलंय.