इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये  मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास झालेल्या भूकंपामुळे मोठी हानी झाली आहे. भूकंपाचे केंद्रबिंदू मीरपूरमधील जाटलन येथे होते. पाकिस्तानमध्ये भूकंपामुळे ४ जणांचा मृत्यू, ७६ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता ६.३ रिक्टरस्केल मोजली गेली. आतापर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार रस्ते दुभांगले असून अनेक गाड्या या रस्त्यात गाढल्या गेल्या आहे. दरम्यान, दिल्लीचा परिसर मंगळवारी दुपारी ४ वाजून ३३ मिनिटांनी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. पंजाब, जम्मू-काश्मीर आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्येही हे धक्के जाणवले. पाकिस्तानच्या रावळपिंडीपासून ८१ किलोमीटर अंतरावर या भूंकपाचा केंद्रबिंदू होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भूकंपानंतर पाकिस्तानच्या मीरपूरमध्ये आपात्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी आणि लाहोरसह अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय मुलतान, फैसलाबाद, टॅक्सीला येथे भूकंपाचे तीव्र तीव्र धक्के जाणवले.



या सूत्रांच्या माहितीनुसार मीरपूरमध्ये भूकंपामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. रस्ते मोठ्या प्रमाणात खचले गेले आहेत. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाजवा यांनी सैन्याला मदतीचे आवाहन केले आहे. जिथे जिथे लोकांचे नुकसान झाले तेथे सैन्य जवानांनी मदतीसाठी हातभार लावला. जटलानजवळील पुलमांडा बाजार जवळ पूल कोसळला आहे. हा पूल पडल्यामुळे अनेक गावांपासून संपर्क तुटला आहे.