काबूल : अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील बादघिस प्रांतात सोमवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यामुळे झालेल्या नुकसानीत 26 लोकांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणी अपघात होऊन अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 इतकी मोजण्यात आली. (26 Dead After 5.3 Earthquake Hits Western Afghanistan)


घराचे छत कोसळल्याने अनेक गाढले गेलेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाघिसचे गव्हर्नर मोहम्मद सालेह यांनी सांगितले की, कादीस जिल्ह्यात घराचे छत कोसळल्याने अनेक लोकांचा घराच्या ढिगाऱ्यात अनेकांचा मृत्यू झाला. याशिवाय इतरही अनेक लोक जखमी झाले असून त्यात लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.


भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या 26 लोकांमध्ये पाच महिला आणि चार मुलांचा समावेश आहे. तसेच आणखी चार जण जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे प्रांतातील मुकर जिल्ह्यातील रहिवाशांचेही नुकसान झाले. परंतु जीवितहानीसह तपशील अद्याप उपलब्ध नाहीत,  अशी माहिती देण्यात आली.


पाकिस्तानच्या उत्तर भागात शुक्रवारी असेच धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5.6 इतकी असल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 5.6 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमा भागात 100 किमी खोलीवर होता.


पेशावर, मानशेरा, बालाकोट आणि चारसदासह खैबर-पख्तूनख्वामधील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, सुदैवाने भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नाही.