टोकियो : जपानमध्ये मंगळवारी 25 वर्षानंतर सगळ्यात मोठं वादळ आलं आहे. देशाच्या हवामान खात्याने जोरदार वादळ आणि पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम जपानमध्ये दुपारी 216 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने हे वारे वाहत आहेत. उन्हाळ्यात देखील या भागात जोरदार पाऊस झाला होता.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान शिन्जो आबे यांनी लोकांना लवकरात लवकर हा परिसर रिकामा करण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांनी लोकांचं स्थलांतर आणि मदत पुरवण्याचे आदेश दिले आहेत. जपानच्या हवामान खात्याने भूस्खलन, पूर, वादळ, ऊंच लाटा, वीज पडणे आणि चक्रीय वादळ याचा इशारा दिला आहे.



हवामान खात्याचे प्रमुख रयुता कुरोरा यांनी म्हटलं की, वादळ त्याच्या केंद्र स्थानापासून 162 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वाहू शकते. 1993 नंतर येथे असं वादळ आलं आहे.