Viral Video On Internet: आपली मुलं परीक्षेत टॉप यावी यासाठी प्रत्येक पालक प्रयत्नशील असतो. पालक आपल्या मुलांवर परीक्षेत टॉप येण्यासाठी खूप दबाव टाकतात.  मात्र अनेकदा मुलांवर दडपण येत असल्याने प्रगती खुंटते. डॉक्टर आणि इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांवरच नाही तर लहान मुलांवरही अभ्यासासाठी खूप दबाव असतो. पालकांची ही इच्छा मुलांपासून त्यांचे बालपण हिरावून घेते. अशीच एक घटना चीनमधून समोर आली आहे, जिथे एक वडील आपल्या मुलाचा निकाल पाहून खूप निराश झाल्याचं दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाचे गणितातील गुण कळल्यावर वडील अश्रू अनावर झाले आहेत. ओक्साबोक्शी रडत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.  मुलाला 100 पैकी फक्त 6 गुण मिळाले आहेत, याचा अर्थ मुलगा परीक्षेत नापास झाला आहे. हे पाहून वडिलांच्याही पायाखालची जमिन सरकते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


एक वर्ष गणिताचा अभ्यास केला


वडिलांनी स्वत: आपल्या 6 वर्षाच्या मुलाला वर्षभर गणित शिकवले होते. एवढी मेहनत करूनही जेव्हा मूल पास होऊ शकले नाही तेव्हा वडिलांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ते कॅमेऱ्यावरच रडायला लागले. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्स आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांच्या मते, जर वडिलांनी मुलाला शिक्षण देण्यासाठी इतकी मेहनत घेतली असेल तर वाईट वाटणे स्वाभाविक आहे. त्याच वेळी, काही युजर्संनी मुलाचे समर्थन केले आणि वडिलांना शांत राहण्याचा आणि इतर पर्याय शोधण्याचा सल्ला दिला आहे.