नवी दिल्ली : गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांच्यावर आता अल्फाबेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांनी अल्फाबेटचं नेतृत्त्व करण्यास नकार दिल्यानंतर ही जबाबदारी आता पिचई पेलणार आहेत. या निवडीनंतर भारतीय-अमेरिकन वशांचे पिचई आता जगातील महत्त्वाचे कॉर्पोरेट व्यक्तीमत्व ठरले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलचीच कंपनी असलेली अल्फाबेटने सुंदर पिचाई यांना सीईओ केलं आहे. गुगलला बनवणारे लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी कुटुंबाला वेळ देण्यासाठी वेळ मिळत नसल्याने हे पद सोडलं. त्यानंतर ही जबाबदारी पिचई यांच्याकडे आली.


गुगलची सुरुवात १९९७ मध्ये झाली होती. त्यानंतरच आय़टी सेक्टरमध्ये मोठं परिवर्तन झालं होतं. पण जसं-जसं गुगल वाढलं तसं त्याने इतर क्षेत्रातही उडी घेतली. ज्यापैकी अल्फाबेट ही एक कंपनी आहे. गुगलने ही कंपनी इतर प्रोजेक्ट घेण्यासाठी सुरु केली होती.


अल्फाबेटचे सीईओ लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी पत्र लिहित राजीनामा देत असल्याची घोषणा केली. सोबतच ही जबाबदारी त्यांनी सुंदर पिचई यांनी सोपवत असल्याची घोषणा केली. पण दोघेही कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये असणार आहेत. आता कंपनी खूप पुढे निघून गेली आहे, त्यामुळे २ सीईओंची गरज नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.


गुगलचा २००४ मध्ये मोठा विस्तार होण्यास सुरुवात झाली. सर्च इंजिननंतर, गुगल मॅप, गुगल फोटो, यूट्यूब, गुगल डिवाईस, गूगल क्लाऊड सुरु झालं. या सर्व कंपन्या अल्फाबेटच्या अंतर्गत काम करतात.