Space Emergency: भारतीय मूळच्या आणि नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांच्या अंतराळ दौऱ्याबाबत चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. सुनिता विलिम्स पृथ्वीवर कधी परतणार याची आस लावू सारे बसले आहेत. असे असताना अंतराळातून एक अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सध्या तणावपूर्व स्थिती असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना बोईंगच्या स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट आणि इतर परतीच्या वाहनांमध्ये आपत्कालीन आश्रय घेणे भाग पडले आहे. नेमका काय घडलाय हा प्रकार? यावर नासाने काय अपडेट दिलीय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधीच सुनीता विल्यम्स यांचे पृथ्वीवर परतणे लांबले आहे. त्यात स्टेशनजवळील उंचीवर उपग्रह तुटल्याची माहिती नासाला मिळाली. परिभ्रमण करणाऱ्या प्रयोगशाळेला अवकाशातील ढिगाऱ्यांमुळे धोका निर्माण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर बुधवारी आपत्कालीन आदेश जारी करण्यात आला. यानंतर मिशन कंट्रोलने सुनिता विल्यम्स यांच्यासह सर्व क्रू सदस्यांना त्यांच्या संबंधित अंतराळ यानामध्ये आश्रय घेण्यास सांगितले. सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांनी 5 जूनपासून ISS वर असून त्यांनी स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये आश्रय घेतला आहे.


अंतराळवीर त्यांच्या संरक्षक आश्रयस्थानात


मिशन कंट्रोलने सुमारे एक तास ढिगाऱ्याच्या मार्गाचे बारकाईने निरीक्षण केले. या काळात नासाचे अंतराळवीर त्यांच्या संरक्षक आश्रयस्थानात राहत आहेत. धोका संपलाय हे निश्चित करा आणि त्यानंतरच अंतराळ यानामधून बाहेर पडा, असे निर्देश क्रूला देण्यात आले आहेत. यानंतरच स्टेशनवर सामान्य ऑपरेशन्स पुन्हा सुरू करता येणार आहेत.


अंतराळातील ढिगाऱ्यांचे आव्हान 


नासासमोर सध्या अंतराळातील ढिगाऱ्यांचे आव्हान आहे. ढिगाऱ्यासोबतच या निमित्ताने क्षेत्रिय ऑपरेशनमध्ये सुरक्षा प्रोटोकॉलचे महत्त्वदेखील अधोरेखित झाले आहे. तसेच आणीबाणीच्या परिस्थितीत संभाव्य लाइफबोट म्हणून काम करण्याची स्टारलाइनरची क्षमता यातून दिसून आली आहे.  ISSवर डॉक केलेल्या कोणत्याही क्रू वाहनासाठी हे अत्यंत महत्वाचे कार्य असते.


 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ अंतराळात


सुनिता विल्यम्स आणि विल्मोर यांचा अंतराळातील मुक्काम आधीच वाढला आहे. स्टारलाइनर अंतराळयानाच्या तांत्रिक समस्यांमुळे त्यांच्या पृथ्वीवर परतण्याच्या मोहिमेस आधीच विलंब झाला आहे. 8 दिवसांच्या मोहिमेचे त्यांचे नियोजन होते. असे असताना नासाचे अंतराळवीर आता 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ अंतराळात आहेत.


'सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्यास सक्षम'


बोईंग हेलियम गळती आणि थ्रस्टर समस्येमुळे कॅप्सूलवर परिणाम होतोय. यावर आम्ही करत असल्याचे नासाने म्हटले आहे. असे असले तरी स्टारलाइनर अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्यास आम्ही सक्षम असल्याचे नासाने म्हटले आहे.अंतराळातील गतीविधींचा विस्तार होत असताना, ऑर्बिटल कचरा व्यवस्थापन ही जगभरातील अंतराळ संस्थांसाठी चिंतेची बाब बनत चालली आहे.