Super fertile mother:  मातृत्वाची चाहुल  ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वात सुखद क्षण असतो. एक महिला गरोदर असताना दोन महिन्यात पुन्हा गरोदर राहिली आहे. म्हणजे दोन महिन्यात ही महिला दोन वेळा गरदोर राहिली. या महिलेची दोन वेळा प्रसुती झाली. दोन महिन्याच्या फरकाने या महिलेने दोन बाळांना जन्म दिला आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका महिलेला मातृत्वाचा हा विलक्षण अनुभव आला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ही अत्यंत दुर्मिळ केस आहे. वैद्यकीय भाषेत याला Superfetation असे म्हणतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोफी स्मॉल असे या महिलेचे नाव आहे. दोन महिन्यात सोफी दोनदा गर्भवती राहिली. सोफीने दोन महिन्याच्या फरकारने जुळ्.ा बाळांना जन्म दिला आहे. दोन्ही मुलांची गर्भधारणा वेगवेगळ्या वेळी झाली होती. अशा प्रकारची गर्भधारणा ही अत्यंत दुर्मिळ मानली जाते. अशा प्रकारच्या जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या मातांना वैद्यकीय भाषेत Super fertile mother असे संबोधले जाते.


सोफी पहिल्यांदा गरोदर राहिली तेव्हा तिला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. तसेच तिला अनेक शारिरीक त्रास सुरु झाले. यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा ती पुन्हा एकदा गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


सोनोग्राफीमध्ये झाले दोन बाळांचे निदान


दोन महिन्यात सैफी दुसऱ्यांचा गरोदर असल्याचे प्राथमिक तपासणीत उघड झाले. यामुळे डॉक्टरांनी तिची  सोनोग्राफी केली असता तिच्या पोटात दोन गर्भ वाढत असल्याचे उघड झाले. ही जुळी मुलं होती. पण, यांच्या वयामध्ये अंतर आढळले. दोघांचा गर्भवाढीचा कालावधी वेगळा असल्याचे पाहून डॉक्टरही अचंबित झाले.


अशी केली दोन वेळा प्रसुती


या महिलेच्या पोटात गर्भ वाढत असले तरी त्यांचा वाढीचा कालावधी वेगवेगळा होता. यातील एकही र्गभ रिकामा करणे महिला तसेच बाळांसाठी धोकादायक होते. डॉक्टरांनी 29 व्या आठवड्यापर्यंत वाट पाहिली. शेवटी दोन महिन्यांच्या फरकाने या महिलेची दोनदा प्रसुती करण्यात आली. दोन महिन्यात या महिलेने दोन बाळांना जन्म दिला. 


Superfetation म्हणजे काय?


अशा प्रकारची गर्भधारणा अत्यंत दुर्मिळ केस मानली जाते. वैद्यकीय शास्त्राच्या इतिहासात अशा प्रकराची हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीचं प्रकरणं समोर आली आहेत. यूके, इटली आणि कॅनडामध्ये अशा प्रकारे महिलांची प्रसुती झाली होती. अशा प्रकारे महिलांची प्रसुती करणे अत्यंत अव्हानात्मक असते.