नवी दिल्ली : न्यूयॉर्कमध्ये गुरुवारी भरलेल्या सार्कच्या बैठकीतून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज निघून गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांना टाळण्यासाठी त्या निघून गेल्याची चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांची परिषद सुरू आहे. त्यासाठी सुषमा स्वराज न्यूयॉर्कमध्ये आहेत. या परिषदेदरम्यान सार्क देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची एक अनौपचारिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला स्वराज हजर होत्या. तिथं आपली बाजू मांडल्यानंतर त्या उठल्या आणि थेट बाहेर पडल्या. 



पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी या प्रकारावर टीका करण्याचा प्रयत्न केला. मात्र या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलेल्या नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप कुमार ग्यावली यांनी स्वराज यांचं समर्थन केलंय. 


कदाचित तब्येत बिघडल्यामुळं त्या निघून गेल्या असाव्यात, असं नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांची सांगितलं. शिवाय भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले हे बैठक संपेपर्यंत हजर असल्याचंही भारताकडून सांगण्यात आलंय.