नवी दिल्ली : मोसुलमध्ये बेपत्ता असलेले सर्व म्हणजेच ३९ ठार झालेत, अशी माहिती परदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३९ पैंकी ३८ मृतदेहांचे डीएनए सॅम्पल मॅच झालेत. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटनं या सर्वांची हत्या करून त्यांचं दफन केलं होतं. 


या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए सॅम्पल त्यांना पंजाब, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहारमध्ये धाडण्यात आले होते. सर्वात अगोदर संदीप नावाच्या एका तरुणाचे सॅम्पल मॅच झाले. 


हत्या करण्यात आलेल्या सर्व भारतीयांचे मृतदेह अमृतसर एअरपोर्टला आणले जातील. मृतकांमध्ये ३१ पंजाबचे, ४ हिमाचल आणि उरलेले इतर पश्चिम बंगाल-बिहारचे आहेत, असंही सुषमा स्वराज यांनी म्हटलंय. 


स्वत: जनरल व्ही के सिंह मृतदेह भारतात आणण्यासाठी इराकला जातील... ज्या विमानात हे मृतदेह आणले जातील ते अगोदर अमृतसर, त्यानंतर पाटना आणि कोलकाता जाईल.