मुंबई : तुम्ही सिनेमात किंव खऱ्या आयुष्यातही लोकांना स्विस बँकेत पैसे ठेवल्याचे ऐकले असाल. तसेच आपण कोणाच्याही काळा पैसा किंवा ब्लॅक मनीबद्दल बोललो तर, आपण असेच म्हणतो की, याने स्विस बँकेतच पैसे ठेवलेले असावे. परंतु आपण असे का म्हणतो? कारण या बँकेत पैसे ठेवले व्यक्तींचा डाटा कोणालाच मिळत नाही. ज्यामुळे हे लोकं इनकम टॅक्स आणि अन्य आधिकाऱ्यांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी त्यांचे पैसे या बँकेत ठेवतात असे बोलले जाते. परंतु तुम्हाला ही बँक कुठे आहे? यामध्ये लोकं का पैसे ठेवतात? याचे खरे कारण माहितंय का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्विस बँक म्हणजे स्विट्जरलँडमधील बँका, स्विट्जरलँड हे जगातील सगळ्यात स्टेबल आणि चांगली अर्थ व्यवस्था असलेल्या देशांपैकी एक आहे. हेच कारण आहे ज्यामुळे स्विट्जरलँडमधील बँकांवर लोकं विश्वास ठेवतात.


आपल्या  गोपनीयता धोरणामुळे म्हणजेच त्याच्या प्रायवसी पॉलिसीमुळेच स्विस बँकेची जगभर चर्चा आहे, कारण ते ग्राहकांची माहिती कोणाबरोबरही शेअर करत नाहीत. स्वित्झर्लंड हा जगातील एक श्रीमंत देश आणि एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र देखील आहे.


लोकं स्विस बँकेत खाते का उघतात?


1934 च्या बँकिंग कायद्यात ग्राहकाची ओळख जाहीर करणे हा एक गुन्हा आहे. यामुळे, बँक कोणत्याही ग्राहकाची माहिती कोणालाही देत ​​नाही. ही माहिती केवळ बँकेकडेच असते. म्हणजेच, जर तुम्ही बँकेत पैसे जमा केले, तरी तुमचं यामध्ये खातं आहे की नाही किंवा खात्यात किती पैसे आहेत याची माहिती कोणालाही दिली जात नाही.


याव्यतिरिक्त, जेव्हा खातेदारांकडून बँकेत पैसे जमा केले जातात. तेव्हा हे पैसे कोठून आले आणि त्या पैशाचे स्रोत काय? असा प्रश्न त्यांना विचारला जात नाही. यामुळे लोकं कोणत्याही अडचणीशिवाय लाखो रुपये या बँकेत जमा करतात.


पैसे लपवण्यासाठी काय नियम आहेत?


असे मानले जाते की, तिथे केवळ काळा पैसा ठेवला जातो. कारण कोणत्याही सोर्सशिवाय किंवा हा पैसा कुठून आला अशी कोणतीही माहिती न मागता पैसे जमा करतात. तसेच ही बँक आपली माहिती इतर कोणालाही देत नाहीत.


इतकेच नाही तर जेव्हा तुम्ही बॅंकेत खाते उघडता तेव्हा बँक तुमच्याशी फक्त खाते क्रमांकावर व्यवहार करते. बँकेला तुमचे नाव, पत्ता किंवा व्यवसाय इत्यादींबद्दल कोणतीही माहिती नसते. ज्यामुळे लोकांची प्रयवसी जपली जाते.


खाते कोण उघडू शकते?


असे म्हटले जाते की, केवळ पुष्कळ पैसे असलेले लोक स्विस बँकेत खाते उघडू शकतात, परंतु तसे नाही. या बँकांमध्ये, 18 वर्षे पेक्षा जास्त वयाची प्रत्येक व्यक्ती खाते उघडू शकते. परंतु त्या व्यक्तीकडे वैध पासपोर्ट असणे आवश्यक आहे. परंतु या बँकांना जर समजले की, या व्यक्तीचे उत्पन्न चुकीच्या मार्गाने आलेले आहे, तर बँका अशा लोकांचे खाते रद्द करू शकतात.


स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेने गुरुवारी जाहीर केले आहे की, सन 2020 मध्ये स्विस बँकांमधील भारतीयांचे पैसे 20 हजार 700 कोटींपेक्षा जास्त झाले आहेत. ही रक्कम भारतात असलेल्या शाखा आणि इतर वित्तीय संस्थांमार्फत पाठवली गेली आहे. 2019 च्या अखेरीस स्विस बँकांमध्ये भारतीयांचे 6625 कोटी रुपये होते.