तैवानच्या पंतप्रधानांनी दिला राजीनामा
तैवानचे पंतप्रधान लिन चुआन यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. चुआन यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण राष्ट्रपती सई इंग-वेन यांच्याकडे राजीनामा दिल्याची घोषणा केली. दरम्यान, राष्ट्रपती सई इंग-वेन यांनी हा राजीनामा स्विकारला किंवा नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
तायपे/नवी दिल्ली : तैवानचे पंतप्रधान लिन चुआन यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. चुआन यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण राष्ट्रपती सई इंग-वेन यांच्याकडे राजीनामा दिल्याची घोषणा केली. दरम्यान, राष्ट्रपती सई इंग-वेन यांनी हा राजीनामा स्वीकारला किंवा नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
वृत्तसंस्था सिन्हुआने दिलेल्या वृत्तात राष्ट्रपती सई ईंग-वेन यांनी पंतप्रधानांचा राजीनामा स्वीकारला आहे. मे २०१६ मध्ये चुआन यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली होती. दरम्यान, सूत्रे हाती घेताच त्यांनी कायदेशीर अंमलबजावणी तसेच अनेक कायदे पारीत करण्याचा धडाका लावला होता. यात पेन्शन सुधारणा तसेच, राजकीय पक्षांच्या संपत्तीचे नियंत्रण आणि कामगार कायद्यात सुधारणा अशा अनेक कायद्यांचा समावेश आहे.
राजीनामा देताना चुआन यांनी म्हटले आहे की, आपणास शक्य तेवढे आपण काम केले आहे. तसेच, पदावर आल्यावर आपण ठरवलेली सर्व ध्येयं पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता राष्ट्रपतींना सत्ता देण्याची वेळ आली आहे. जेणेकरून ते राष्ट्राला आणि त्यांच्या विचारांना न्याय देऊ शकेल अशा व्यक्तीची निवड करू शकतील.
पुढे बोलताना चुआन यांनी सांगितले की, एका राष्ट्रीय सुरक्षा बैठकीदरम्यान आपण राष्ट्रपती सई यांना राजीनाम्याची पूर्वकल्पना दिली होती. तैवानच्या केंद्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चुआन यांचा राजीनामा स्विकारल्यावर तैवानचे मेयर लई चिंग-ते यांची पंतप्रधानपदी निवड केली जाईल.