काबूल : राजधानी काबुलपासून आता तालिबानी टोळ्या अवघ्या 90 किलोमीटरवर आल्या आहेत. सर्व महत्त्वाच्या शहरांवर तालिबानी झेंडा फडकलाय. त्यामुळे आता काबुलचा पाडाव होण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी गेल्यानंतर  तालिबानी अतिरेक्यांनी एकामागून एक प्रदेश ताब्यात घेण्यास सुरूवात केलीये. (Taliban captured the cities of Kandahar Ghazni and Herat now march towards capital Kabul)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानच्या 34 पैकी एक डझनापेक्षा जास्त प्रांत तालिबाननं ताब्यात घेतलेत. काबुलनंतर दुसरं शहर, कंधारचा शुक्रवारी पाडाव झालाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी रात्री तालिबानी फौजांनी कंधारवर हल्ला चढवला. सरकारी कर्मचारी शहर सोडून पळाले असून सर्व कार्यालयांवर आता तालिबानचा ताबा आहे. 



आता गझनी शहरावर कब्जा केल्यानंतर राजधानी काबुल तालिबान्यांच्या टप्प्यात आहे. हेरातमध्ये सरकारी कर्मचा-यांनी शरणागती पत्करल्याचा एक व्हिडिओ तालिबाननं जारी केलाय. हेरातमधल्या सर्वात मोठ्या ऐतिहासिक मशिदीवर तालिबाननं ताबा मिळवलाय.


दोन तृतियांश देश पुन्हा एकदा तालिबानच्या वर्चस्वाखाली आला असून 20 वर्षांपूर्वीची स्थिती पुन्हा एकदा निर्माण झालीये. यामुळे नागरिकांचं स्वातंत्र्य धोक्यात आलंय. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट येणं ही भारतासह अन्य शेजारी देशांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.


ताबिलानी फौजा पद्धतशीरपणे राजधानी काबुलला वेढा घातलायत. काबुलपासून अवघ्या 90 किलोमीटरवर अतिरेकी येऊन पोहोचलेत. अशा वेळी अब्दुल घनी सरकार कचखाऊ भूमिका घेताना दिसतंय. लोकशाही मार्गानं निवडून आलेल्या अफगाणी सरकारचा मनानं पराभव झालाच आहे. आता केवळ संसदेवर तालिबानचं पांढरं निशाण फडकणं बाकी आहे.