काबूल : अफगाणिस्तानच्या सत्तेवर ताबा घेणाऱ्या तालिबानने अफगाण सैन्याला एक अशी ऑफर दिली, ज्यामुळे केवळ पाकिस्तानच नाही, तर चीनचीही चिंता वाढला आहे. खरं तर, तालिबानने लष्करातील जवान आणि अफगाणिस्तान सरकारमध्ये उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्यासोबत काम करण्याची ऑफर दिली आहे. या ऑफरने सगळ्यांनाच विचार करायला लावलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तालिबानने अफगाणिस्तान सैन्याला दिलेल्या या ऑफरला इतकं महत्त्वाचं मानलं जातं कारण, अफगाणिस्तानच्या सैन्याचे प्रशिक्षण हे 2004 पासून ते या वर्षीच्या सत्ताबदल होईपर्यंत अमेरिकन सैनिकांच्या देखरेखीखाली होते. अशा परिस्थितीत तालिबान्यांसोबत एकत्र काम करण्याच्या उद्देशाने तालिबान्यांशी जवळीक साधू पाहणाऱ्या चीन आणि पाकिस्तानला धक्का बसला आहे.


मध्य आशियाई प्रकरणातील तज्ज्ञ आणि दिल्ली विद्यापीठाचे इतिहासकार प्राध्यापक कुसुम जोहरी म्हणतात की, तालिबान्यांकडून ही ऑफर अशीच आली नाही. तर ते म्हणतात की, तालिबानने खूप विचार करुन अफगाणिस्तानच्या सैन्यात काम केलेल्या सैनिकांना आणि जवानांना आपल्यामध्ये सामील करून घेण्याची रणनीती आखली आहे. 


त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या मागचे सर्वात मोठे कारण म्हणजे तालिबान संपूर्ण जगाच्या लोकांना संदेश पाठवू इच्छित आहे की, तो सर्वांना त्यांच्या बरोबर घेऊन पुढे जायला सुरुवात करत आहे. म्हणजेच ते पूर्वीचे तालिबानी राहिले नाहित. यामुळे संपूर्ण जगाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलेल.


दुसरे आणि मुख्य कारण म्हणजे, अफगाण सैन्याचे सैनिक आणि जवान ज्यांनी वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या नाटो फौजेसोबत एकत्र काम केले आहे, त्यांना लष्करी उपकरणे आणि अमेरिकन सैन्याने पुरवलेल्या दारुगोळ्यासह सर्व तंत्रज्ञानाचे संपूर्ण ज्ञान आहे. अजूनही बरीच अशी लष्करी उपकरणे आहेत ज्याला तालिबान वापरू शकत नाही.


जर वेगवेगळ्या बटालियन आणि अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये काम करणारे सैनिक आणि अधिकारी तालिबानशी जोडले गेले, तर बरीच न वापरलेली तांत्रिक लष्करी उपकरणे तालिबानसाठी उपयोगी पडतील.


यामागील तिसरे आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे, अफगाणिस्तानच्या लष्करातील जवान आणि अधिकार्‍यांचा अजूनही उपराष्ट्रपती अमरूल्लाह सालेहकडे कल आहे, जो एकेकाळी अफगाण सैन्याचा प्रमुख होता. तालिबानचा असा विश्वास आहे की, जर अधिकारी आणि सैनिकांनी त्यांच्यासोबत काम केले, तर ते अमरुल्ला सालेहसाठी असलेली सहानुभूती संपवण्यात त्यांना मदत मिळेल.