भारत-चीन वाद: ५ तास चालली कमांडर स्तरावरील बैठक, चीनला सैन्य मागे घेण्याच्या सूचना
गेल्या अनेक दिवसांपासून सीमेवर तणावाचं वातावरण
नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात एलएसीवर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही देशांच्या मध्ये कमांडर स्तरावर चर्चा झाली. ही चर्चा एलएसी परचशूलच्या समोर चीनकडील मोल्दोमध्ये झाली. भारतीय सैन्याच्या प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व लेहमधील 14 कॉर्पचे कमांडर लेफ्टिनेंट जनरल हरिंदर सिंह यांनी केलं तर चीनकडून दक्षिण शिनजियांगचे सैन्य कमांडर मेजर जनरल लियू लिन यांनी नेतृत्व केलं. ही बैठक पाच तास चालली. सूत्रांच्या माहितीनुसार भारताने चीनला पँगोंग झील जवळून सेना आणि स्ट्रक्चर मागे हटवण्याच सांगितले आहे.
दोन्ही देशांनी पूर्व लद्दाख क्षेत्रात खासकरुन पैंगोंग त्सोच्या उत्तर भागातील वाद संपवण्यासाठी चर्चा केली. जेथे चीनी पीपुल्स लिबरेशन आर्मी (PLA) ने यथास्थितीला बदलण्याचा प्रयत्न केला आहे. हे क्षेत्र सध्या भारताच्या नियंत्रणात आहे. याआधी दोन्ही देशांच्या मेजर जनरल रँकच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली होती. पण त्याचा कोणताच परिणाम निघाला नव्हता.