Tech Sector Layoff : मागील दोन वर्षांपासून टांगती असणारी नोकरकपातीची तलवार अद्यापही कायम असून, या परिस्थितीचा फटका यंदाच्या वर्षात तुलनेनं अधिक कर्मचाऱ्यांना बसताना दिसत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये जवळपास 27000 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या कमावल्या असून, टेक कंपन्यांमध्ये ही संकटाची लाट अधिक प्रभाव पाडताना दिसत आगे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटेल, आयबीएम आणि सिस्को अशा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकरकपात केल्यामुळं अनेकांवर भविष्यात पुढे काय होणार, याच मुद्द्यावर विचार करण्याची वेळ आली आहे. 2024 मध्ये जवळपास 136,000 टेक कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली. जवळपास 422 कंपन्यांमधून इतक्या मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला असून, येत्या काळात आणखी कर्मचारी नोकरी गमावणार असल्याचं सांगितलं जात आहे. 


कोणत्या कंपनीतून किती कर्मचाऱ्यांना नारळ? 


Dell Technologies: डेल टेक्नोलॉजिस या कंपनीतून जागतिक स्तरावर 10 टक्के अर्थात 12500 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पण, कंपनीनं मात्र याबाबतची अधिकृत माहिती दिलेली नाही. 


Apple: अॅपलनं हल्लीच सर्विस ग्रुपमधून 100 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. याशिवाय महत्त्वाच्या प्रोजेक्टमधून कंपनीनं 600 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. 


GoPro: या अॅक्शन कॅमेरा मॅन्युफॅक्चरर कंपनीनं 15 टक्के नोकरकपात केली असून, एकूण खर्चात साधारण  $50 मिलियनची घट केली. 


हेसुद्धा वाचा : Ganesh Utsav 2024 : करावं तरी काय? कोकणात जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी; 'हे' रस्ते फुल्ल, विघ्न संपेना 


IBM: आयबीएमनं चीनमधील रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागात काम करणाऱ्या जवळपास 1000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. 


Cisco Systems: सिस्को सिस्टीम या कंपनीनं 6000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. एआय आणि सायबर सिक्युरिटी अशी कारणं पुढे करत हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. 


Intel: 2025 पर्यंत एकूण खर्चापैकी साधारण 10 बिलियनची कपात करण्याच्या हेतूनं इंटेलकडून 15000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 


एकंदरच आयटी आणि माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सध्या सुरु असणाऱ्या या सर्व घडामोडी पाहता त्यामुळं नोकरदारांवर मोठं संकट आल्याचं स्पष्ट होत असून, तूर्तास हे संकट शमणार नाही हेच स्पष्ट होत आहे.