एकीकडे कोरोनामुळे बेरोजगारी, तर `या` कंपनीकडून कर्मचाऱ्यांना लाखोंचा बोनस
कोरोना काळात अनेकांना निम्म्या पगारावर घरखर्च भागवावा लागला. मात्र या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना लाखोंचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : कोरोना काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. त्यामुळे अनेक जण बेरोजगार झाले. ज्यांना नोकरी होती त्यांच्यासमोर ती वाचवण्याचे आव्हान होते. पण एक अशी कंपनी आहे, ज्या कंपनीने कोरोना काळात आपल्या कर्मचाऱ्यांवर पैशांचा पाऊस पाडला आहे. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोना काळात तब्बल सव्वा लाख रुपयांचा घसघशीत बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. (Technology company Microsoft Corporation give special covid bonus To employees due to good performance during corona period)
मायक्रोसॉफ्ट या प्रसिद्ध कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला 1 लाख 25 हजारांचा चांगलाच बोनस मिळणार आहे. कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी काम केल्याने कंपनीकडून बक्षिस स्वरुपात ही रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा एकूण 1 लाख 75 हजार कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार आहे. विशेष म्हणजे पार्ट टाईम काम करणा-यांनाही बोनस दिला जाणार आहे.
दरम्यान याआधी फेसबुक आणि अॅमेझॉनसारख्या कंपन्यांनीही कर्मचा-यांना स्पेशल बोनस दिलाय. कर्मचा-यांनी नेटानं काम केलं, तर त्याची उचित दखलही घेतली गेली पाहिजे, हे मायक्रोसॉफ्टनं दाखवून दिलंय. सगळीकडेच अस्वस्थतेचं वातावरण असताना कंपनीनं उचलेलं हे पाऊल निश्चित उर्जा देणारं आहे.