Viral News : सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. तंत्रज्ञानाने (Technology) मोठी प्रगती केली असून जवळपास सर्व कामं डिजिटल (Digital) झाली आहेत. बोटाच्या एका क्लिकवर अनेक कामं पूर्ण करणं सहज सोप्प झालं आहे. यातलंच एक तंत्रज्ञान म्हणजे गुगल मॅप (Google Maps). पूर्वी एखाद्या ठिकाणी जायचं असल्यास त्या ठिकाणाचा पत्ता शोधताना अनेक अडचणी येत होत्या. पण आता गुगल मॅपमुळे तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही विना अडथळला पोहोचू शकता. प्रवास करताना लोकेशन समजण्यासाठी हल्ली सर्वच जण गुगल मॅपचा वापर करतात. गुगल मॅपमुळे रस्ते शोधणं सोप झालं आहे. पण गुगल मॅपमुळे एका जोडप्याचा घटस्फोट (Divorce) झाला, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर कदाचीत यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे प्रत्यक्षात घडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगल मॅपमुळे पत्नीची पोलखोल
एखादी व्यक्ती कुठे आहे हे तुम्ही डिव्हाईस लोकेशनद्वारे सहज शोधू शकता. असाच एक प्रकार समोर आला आहे. कामानिमित्ताने बाहेर गेलेली पत्नी बराचवेळ न परतल्याने त्याने पत्नीचं लोकेशन चेक केलं. गुगल मॅपमध्ये स्त्यांचे काही फोटो झूम इन करूनही पाहू शकता. हे पाहत असतानाच व्यक्तीला त्याची पत्नी दिसली. ती ज्या अवस्थेत होती ते पाहून  त्याच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेनंतर पतीने पत्नीविरोधात घटस्फटो घेतला. रस्त्याशेजारी असलेल्या एका बेंचवर त्याची पत्नी परपुरुषासोबत इंटिमेट होताना त्याने पाहिलं. पत्नीचे हे फोटो त्याने गुगल मॅपद्वारे पाहिले होते.


त्या व्यक्तीची पत्नी रस्त्याच्या कडेला एका बेंचवर बसली होती. बेंचवर एक पुरुष झोपला होता, आणि त्याचं डोकं तिच्या मांडीवर होतं. ती ताच्या डोक्यातून प्रेमाने हात फिरवत होती. पेरुची राजधानी लीमा इथली ही घटना आहे. गुगल कॅमेऱ्याने हा फोटो क्लिक केला. संशय आल्याने पतीने हा फोटो झूम करुन पहिला त्यावेळी त्या महिलेने घातलेल्या कपड्यांवरुन ती आपलीच पत्नी असल्याचं त्याने ओळखलं. 


पती-पत्नीचा घटस्फोट
फोटो पाहिल्यानंतर त्याने पत्नीला याचा जाब विचारला, पत्नीनेही आपलं अफेअर असल्याची कबुली दिली. यामुळे संतापलेल्या पतीने तीला न्यायालयात खेचलं. दोघांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेतला.  ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. पार्टनरला किती दिवस धोका देऊ शकता, कधी ना कधी याचा पर्दाफाश होणारच असं लोकांनी म्हटलं आहे.