दोन महासत्तांमध्ये `काळ्या समुद्रा`त संघर्ष, उतरवल्या युद्धनौका
गेल्या काही काळापासून महासत्ता अमेरिका आणि रशिया या दोन मोठ्या राष्ट्रांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांतील संघर्ष काहीसा थंडावल्याच्या बातम्या मध्यंतरी येत होत्या. मात्र, दोन्ही राष्ट्रातील मतभेद कायम असल्याचे पुढे आले आहे. प्राप्त माहितीनुसार रशियाने बलाढ्य युद्धनौका काळ्या समुद्रात उतरवली आहे. तर, त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेही आपली युद्धनौका समुद्रात उतरवली आहे
वॉशिंग्टन: गेल्या काही काळापासून महासत्ता अमेरिका आणि रशिया या दोन मोठ्या राष्ट्रांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांतील संघर्ष काहीसा थंडावल्याच्या बातम्या मध्यंतरी येत होत्या. मात्र, दोन्ही राष्ट्रातील मतभेद कायम असल्याचे पुढे आले आहे. प्राप्त माहितीनुसार रशियाने बलाढ्य युद्धनौका काळ्या समुद्रात उतरवली आहे. तर, त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेही आपली युद्धनौका समुद्रात उतरवली आहे
दरम्यान, अमेरिकी न्यूज चॅनल सीएनएनला दिलेल्या प्रतिक्रियेत अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे की, गेल्या महिन्यात काळ्यात समूद्रात आंतरराष्ट्रीय हवाई सीमेमध्ये रशियाची लष्करी विमानांनी युद्धाभ्यास केला. त्यामुळे अमेरिकेला काळजी वाटते.
दरम्यान, रशियाच्या वृत्तसंस्थेनेही सोमवारी याबाबत वृत्त दिले होते. ज्यात रूसच्या संरक्षण मंत्रालयाचा हवाला देत म्हटले होते की, अमेरिकेच्या नौदलातील ईपी-३ई एरीजचा रस्ता रोखला. तसेच, अमेरिकेच्या विमानांना हवाई रशियाच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन करण्यापासून रोखण्यात आले.