Solar Storm Badly Effects:  सुर्यामुळेच पृथ्वीतलावर सजीवाचे अस्तित्व कायम आहे. सूर्य हा एकमेव असा स्त्रोत आहे ज्यामुळे पृथ्वीला प्रकाश  आणि उष्णता मिळतेय. मात्र, मागील अनेक दिवसांपासून सूर्यावर भयानर स्फोट होत आहेत.  सौर लहरींचा कहर पहायला मिळत आहे. या सौर वादळांचा धोका कायम आहे. या सौर वादळांचा प्रकोप वाढल्यास  मोबाईलचं नेटवर्क गायब होऊ शकते.  टीव्हीचा सिग्नल यंत्रणेत व्यत्य येलू शकतो. तसेच ट्रान्सफॉर्मर उडू शकतो अशी भिती व्यक्त केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटर, नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) ने या सौर वादळांबाबत अलर्ट दिला होता. तसेच नासाने(NASA) देखील सौर वादळांची (Solar storm) भिती व्यक्त केली होती. सौरज्वालांमुळे सूर्यावर मोठा स्फोट होऊन सौर वादळे निर्माण झाली आहेत. याचा परिणमा  चुंबकीय तरंगांवर होत आहे. 


पृथ्वीच्या गाभ्यातून निघणाऱ्या चुंबकीय तरंगांमुळे पृथ्वीच्या भोवती एक प्रकारचं सुरक्षा कवच तयार झालेलं असत. या कवचामुळेच  पृथ्वीचा सूर्याच्या रेडिएशनपासून बचाव होतो.  सौरवादळाच्या वेळी मात्र रेडिएशन अगदीच जास्त प्रमाणात बाहेर पडल्यामुळे हे कवच भेदले जात आहे (Solar Storm Badly Effects). 


ऑगस्ट 2022 मध्ये अशाच प्रकारची सौर वादळे आली होती. सूर्यावर 35 भयानक स्फोट झाले आहेत. तर तब्बल सहा वेळा सौर लहरींचा कहर पहायला मिळाला आहे. 2025 वर्ष हे अत्यंत धोकादायक असेल अशी भिती देखील व्यक्त केली जात आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात सौर वादळं निर्माण होत आहेत. सौर वाऱ्याचा वेगवान प्रवाह पृथ्वीच्या जवळ येत आहे. यामुळे चिंता वाढली आहे. या सौर वादळाचा थेट परिणाम मनुष्यावर होणार नसला तरी तंत्रज्ञानावर याचा मोठा परिणाम होणार आहे. 


सौर वादळाचे  परिणाम


हे सौर वादळांचा थेट परिणमा रेडिओ सिग्नल्सवर होणार आहे. या सौर वादळामुळे सिंग्नल यंत्रमेत व्यत्यय येवू शकतो. GPS नेव्हिगेशन, मोबाईल फोन सिग्नल आणि सॅटेलाइट टीव्हीमध्ये अडचण येवू शकते. पॉवर लाईनमधील करंट जास्त असू शकतो, ज्यामुळे ट्रान्सफॉर्मर देखील उडू शकतो. यामुळे जीपीएस, तसेच मोबईल नेटवर्कवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच पॉवर ग्रीडवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. सूर्याच्या पृष्ठभागावर मोठ्या ज्वाळा तयार होतात यामुळे मोठा किरणोत्सर्गार होतो. यालाच सौरवादळ असे म्हणतात. सौर लहरी ही ऊर्जेचा अचानक स्फोट होतो.