बार्सिलोना : स्पेनमधील बार्सिलोना येथे दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बार्सिलोनामधील सिटी सेंटरमध्ये एका कारने काही नागरिकांना चिरडलं. या दुर्घटनेत १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. 


या घटनेनंतर त्या परिसरातील मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्सिलोनातील लॉस रामब्लास परिसरात एका वाहनाने नागरिकांना चिरडलं. या घटनेनंतर परिसरातील मेट्रो आणि रेल्वे स्टेशन बंद करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. 


या घटनेनंतर वाहनचालकाने घटनास्थळावरुन पळ काढल्याची माहिती समोर येत आहे.