मुंबई : कुख्यात दहशतवादी संघटना (Terrorist Organization) आयसिस (ISIS) भारतावर (India) हल्ला करण्याच्या तयारीत आहे. तीन दहशतवादी संघटना एकत्र हेऊन कारस्थान रचत आहेत. काय आहे, हे भारताविरोधातलं षडयंत्र? (Terrorist Organization ISIS is preparing to Attack India)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण जगात दहशतवादी कारवाया करणारी आयसिस.(ISIS) आयसिसच्या निशाण्यावर आहे भारत. त्यासाठी २ हजार दहशतवादी अफगाणिस्तानात तैनात करण्यात आलेत. या कटात आयसिसला साथ मिळतेय ती दहशतवादी संघटना खोरासनची. खोरासनचा नवा म्होरक्या शिहब अल मुजाहिर भारत आणि आशियातल्या अनेक देशांत हल्ला करण्याचा कट आखतोय. संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्टमधून हा इशारा देण्यात आलाय... भारतासह अफगाणिस्तान, बांग्लादेश, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंकेत हल्ले करण्याचं कारस्थान रचलं जातंय. आयसिस आणि खोरासनला हक्कानी नेटवर्कचीही साथ मिळालीय. हक्कानी नेटवर्क पाकिस्तानची गुप्तचर एजन्सी ISIच्या इशाऱ्यावर काम करतं.


खोरासन दहशतवादी संघटनेनं 2 हजार 200 दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलंय. हे दहशतवादी अफगाणिस्तानच्या अनेक प्रांतांमध्ये पसरले आहेत. शिहब अल मुहाजिरला गेल्या वर्षी नवा म्होरक्या  करण्यात आलं. तेव्हापासून हा क्रूर दहशतवादी आशिया खंडालाच हादरवण्याचं प्लॅनिंग करतोय. दक्षिण आशियात दहशतवादी कारवायांसाठी आयसिसनं नव्या दहशतवाद्यांची ऑनलाईन भरती सुरू केलीय. तीन दहशतवादी संघटना एकत्र येऊन भारतावर हल्ल्याचा कट आखत आहेत.