थायलंड : थायलंडचे पंतप्रधान जनरल जनरल प्रयुत चान-ओ-चा (Gen. Prayut Chan-o-cha) यांना सोमवारी मास्क न वापरल्यामुळे 6 हजार बात म्हणजेच 14 हजार 270 रुपये दंड ठोठावण्यात आला. अहवालानुसार लस खरेदी सल्लागारांशी झालेल्या बैठकीत जनरल प्रयुत यांनी मास्क घातला नव्हता. Thailand PM


गव्हर्नरांची पोलिसांत तक्रार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहाता थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये सोमवारपासून मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. बँकॉकचे राज्यपाल असविन क्वानमुआंग यांनी सोमवारी फेसबुकवर पोस्ट केली. त्यामध्ये त्यांनी असे म्हंटले की, त्यांनी पंतप्रधानांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.


पंतप्रधानांवर सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर शहर अधिकाऱ्याने कारवाईत केरण्याचे ठरवले. त्यावेळी त्यांनी फेसबुक पेजवर, एक मिटींगमध्ये पाहिले की, सर्वांनी मास्क घातला होता फक्त पंतप्रधान मास्क न घालता मीटिंगमध्ये बसले होते.


थायलंड मध्ये कोरोनाचा कहर


थायलंडमध्ये कोरोना व्हायरसच्या नवीन लाटेचा सामना करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. थायलंडमध्ये 1 मे पासून भारतीय नागरिकांना येण्यास बंदी घातली आहे. थायलंडमध्ये सोमवारी कोविड -19 च्या 2 हजारांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण सापडले आणि 8 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.