प्रियकराची अशी फसवणूक कधीच होऊ नये, प्रेयसीचा व्हिडिओ होतोय व्हायरल
TikTok वर एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडबद्दलच्या एका व्हिडिओमध्ये धक्कादायक खुलासा केला.
मुंबई : एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल TikTok वर असा खुलासा केला की व्हिडिओ पाहून तो व्हायरल झाला. या महिलेचा व्हिडिओ 1.7 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. युजर्स या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काही जण तिला 'स्मार्ट' म्हणत आहेत, तर काहींनी तिच्यावर तिच्या प्रियकराचा 'वापर' केल्याचा आरोप केला आहे.
TikTok वर एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडबद्दलच्या एका व्हिडिओमध्ये खुलासा केला की दोघेही गेल्या एका वर्षापासून एकाच घरात एकत्र राहत आहेत. मुलीने सांगितले की तिचा प्रियकर घराचे भाडे आणि इतर सर्व बिले देतो.
पण यानंतर मुलीने जे सांगितले ते ऐकून लोकांना आश्चर्य वाटले. वास्तविक, व्हिडिओमध्ये तिने सांगितले की ती ज्या घरामध्ये ती आणि तिचा प्रियकर राहात आहे. त्या घराची मालकीन तीच आहे. म्हणजेच, घरमालक स्वतः मुलगी आहे.
मुलगी एक वर्षापासून तिच्या प्रियकराकडून भाडे आणि इतर बिले घेत आहे. कारण तिने तिच्या प्रियकराला असे सांगितले आहे की, हे घर तिच्या मैत्रिनीचे आहे.
मुलीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की. त्याला माहित नाही की, मीच या घराची मालकीन आहे. सर्व भाडं आणि बिले माझ्याच खात्यावर येत आहेत. तुम्हाला असं वाटतं का ही गोष्ट कळाल्यानंतर त्याला राग येईल? या महिलेच्या टिकटॉक व्हिडिओवर हजारो लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी तिच्यावर तिच्या प्रियकराचा 'वापर' केल्याचा आरोप केला, तर काहींनी सांगितले की ती 'खोटे' बोलून 'फसवणूक' करत आहे.