मुंबई : बाळाची चाहुल लागली की वेध लागतात ते की मुलगा होणार की मुलगी हे जाणून घ्यायची. बाळाचा जन्म झाला की या प्रश्नाचा उलगडा होतो. परंतु जर तुम्ही तुमच्या मुलांना मोठं केल्यानंतर अचानक कळतं की, त्यांचा जेंडर काही वेगळाच आहे तर? असंच एका मुलासोबत घडलं आहे, जेथे त्याला अचानक कळतं की तो मुलगा नसून मुलगी आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे कसं शक्य आहे? नेमकं असं या मुलासोबत काय घडलं असेल? चाला तर आपण जाणून घेऊयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

33 वर्षींय या तरुणाला आयुष्यातील हे अजब सत्य तेव्हा कळलं जेव्हा तो डॉक्टरकडे गेला.


चीनमधील या तरुणाला लघवीवाटे रक्तस्त्रावाचा त्रास होत होता. म्हणून तो डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर जेव्हा त्याची तपासणी करतात, तेव्हा त्याला त्याच्या स्वत: बद्दल जे सत्य कळतं ते ऐकून तो मुलगा बेशुद्ध झाला.


तुम्ही देखील या मुलाचं सत्य ऐकाल तर तुम्ही देखील थक्कं व्हाल. डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते या तरुणाच्या आयुष्याला कलाटणी देणारं होतं.


या तरुणाला गेल्या 20 वर्षांपासून लघवीवाटे जे रक्तस्त्राव व्हायचा. ते दुसरं तिसरं काही नसून त्याला पीरियड यायचे. म्हणजे तो मुलगा नसून तो मुलगी आहे. हे ऐकताच या तरुणाच्या डोक्यावर दु:खाचं डोंगर कोसळला.


...पण आता बाप होऊ शकतं नाही
तरुणाला लघवीवाटे रक्तस्त्राव होत असताना लघवीपूर्वी आणि नंतर पोटात वेदना व्हायच्या. ही लक्षण ऐकल्यावरही डॉक्टरांच्या लक्षात आलं नाही की, हे पीरियडमुळे होतं आहे. डॉक्टराने त्या तरुणाची संपूर्ण तपासणी केली आणि काही चाचण्या केल्यात. त्यात जे काही धक्कादायक सत्य समोर आलं ते ऐकून अनेकांचं हौश उडाले. त्याचा शरीरात ओवरी आणि गर्भायश देखील आहे.


डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन करुन त्याचा शरीरातून फीमेल ऑर्गन्स काढून टाकले. आता तो सामन्य पुरुष म्हणून आपलं आयुष्य जगू शकतो. मात्र तो आता कधीही बाप होऊ शकतं नाही. हे ही तितकंच खरं आहे, कारण त्याचं शरीर टेस्टिकल्स स्पर्म कधीही बनवू शकत नाहीत.