Video Viral: मै नशे में टल्ली हो गया की करिए, की करिए.... हे गाण सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एका कुत्र्याला परफेक्ट मॅच होत आहे. कारण एक कुत्रा(DOG) दारु पिऊन फुल(drinking alcohol) टल्ली झाला आहे. या कुत्र्याला नुसती दारु चढलीच नाही तर त्याला हँगओव्हर(hangover) देखील झाला आहे. दारुच्या नशेत या कुत्र्याने अशा करामती केल्या ही त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल(Video Viral) झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

@goldensfriend नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन हा टल्ली कुत्र्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो व्हिव्ह्यूज आले आहेत. तर, 6 हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला असून यावर जवळपास 200 कमेंट्स आल्या आहेत. एका रेस्टॉरंटमधील हा व्हिडिओ आहे. कुत्रा आपल्या मालकासह येथे ट्रीटसाठी आला होता.


टेबलवर काही खाद्यपदार्थांचे डिशेस, दारुची बॉटल आणि दारुचा ग्लास दिसत आहे. कुत्र्याच्या मालक त्याच्या मित्रांसह गप्पा मारण्यात दंग झाला असताना कुत्रा ग्लासमधील दारु पित असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. कुत्रा दारु पितानाचा  हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. कुत्र्याने ऐवढी दारु रिचवलेय की त्याला हँगओव्हर झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. कारम व्हिडिओत  थोड्यावेळाने एक तरुण आणि तरुणी कुत्र्याला उचलून नेताना दिसत आहेत. यानंतर हा कुत्रा वॉशरुममध्ये उलट्या करतानाही दिसत आहे. 


हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू अनावर झाले आहे. तर, अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. कुत्रा हा मुका प्राणी आहे. त्याला बिचाऱ्याला दारु का पाजली असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे. कुत्र्याने खूप दारु प्यायली म्हणूनच त्याला हँगओव्हर झाला. कुत्र्याचा या अवस्थेला मालकच जबाबदार आहे. कुत्र्याला दारु पाजणाऱ्या मालकावर कारवाई करा अशी मागणी अनेक युजर्स करत आहेत. 



काही दिवसांपूर्वी नाग-नागिणीचे प्रायव्हेट क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. snake._.world नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन   नाग-नागिणीच्या प्रणयाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. नाग आणि नागिण एकमेकांच्या सहवासात भान हरपून गेल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. त्यावेळेसच हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता. मात्र, हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे याबद्दल काहीच माहिती समोर आलेली नाही. जवळपास 15 ते 30 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओला पाच हजार पेक्षा जास्त लाईक्स आले आहेत.