मालकाला पाहताच बकऱ्यांनी सुरु केला ड्रामा, Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
Social Media Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मजेशीर व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. कारण असे व्हिडीओ पाहिल्यानंतर दिवस आनंदात जातो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Social Media Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मजेशीर व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. कारण असे व्हिडीओ पाहिल्यानंतर दिवस आनंदात जातो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. 8 सेकंदाच्या या व्हिडीओनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ViralHog नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, फार्ममध्ये एक ट्रक वेगाने येतो. तेव्हा तिथल्या बकऱ्या आपल्या मालकाला पाहतात आणि लगेचच ड्रामा सुरु करतात. बकऱ्या चरताना तुम्ही पाहू शकता. पार्सल ट्रक जवळ येत असल्याचे पाहून या सर्व बकऱ्या आपापल्या जागी उभ्या पडतात. त्यांची अॅक्टिंग पाहून तुम्हीही स्वत:ला हसण्यापासून रोखू शकत नाहीत. बकऱ्या एकत्रितपणे बेशुद्ध होण्याचं नाटक करतात. या व्हिडीओखाली युजर्स मजेशीर कमेंट्स देत आहेत. त्याचबरोबर व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.
एका युजर्सने लिहिलं आहे की, "बकऱ्यांचं कसं लांडगा आला रे आला सारखं झालं आहे. मालकाला पाहून त्यांनी दिलेली रिअॅक्शन काहीसी तशीच आहे." दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "या बकऱ्यांना चित्रपटात कामाला घ्या, जबरदस्त अॅक्टिंग.."