Foreign Tour : परदेशातील संस्कृती, तिथलं राहणीमान आणि इतर अनेक गोष्टींविषयी प्रत्येकालाच प्रचंड कुतूहल असतं. पण, सर्वांनात परदेशात भ्रमंतीची संधी मिळतेच असं नाही. आर्थिक गणितं, सुट्ट्यांची जुळवाजुळव या साऱ्याच गोष्टी त्यावेळी लक्षात घ्याव्या लागतात. पण, आता एका युरोपीय देशाकडून एक भन्नाट संधी देण्यात येतेय. ज्यामध्ये तुम्हाला चक्क तिथं राहण्यासाठी पैसे मिळणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कान किंवा डोळे तपासण्याची गरज नाही. कारण हे खरंय... इटलीमध्ये (Italy) रहण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आता सुवर्ण संधी आली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे इटलीचं सरकार तिथं राहण्याचे पैसेही देणार आहे.


सार्डिनिया (Sardinia) सरकारकडून यासंदर्भात सबसिडी देण्याचासुद्धा निर्णय घेण्यात आला आहे. ही सबसिडी 3 हजारांपासून ते 15 हजार डॉलर इतकी आहे. काय आहे ही नेमकी ऑफर जाणून घेऊया...


अशीच संधी इटलीच्या कॅलेब्रिया बेटासाठी देखील तिथल्या सरकारकडून दिली जातीये. कॅलेब्रिया (Calabria) या बेटावर प्रत्येक नवीन रहिवाश्यांसाठी तब्बल 33 हजार डॉलर तर, सँटो स्टेफीनो दी सेसानिओ या गावात राहण्यासाठी 52 हजार 500 डॉलरची सबसिडी दिली जातीये.


इटलीचा भूभाग असलेल्या आणि निसर्गरम्य सौंदर्याने नटलेल्या सार्डिनिया या बेटावर राहण्यासाठी तिथल्या सरकार कडून 15 हजार यूरो (अंदाजे 11,95,442.92 भारतीय रुपये) प्रत्येक व्यक्तीला दिले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या बेटावरील लोकसंख्या वाढवण्यासाठी नवीन लोकांनी तिथे राहायला यावं म्हणून सरकारने अशी आकर्षक संधी दिली आहे.


इतकंच नाही तर, यूएसमध्येसुद्धा (United States) अशीच अफलातून योजना अस्तित्वात आहे. यूएसच्या काही भागात राहण्यासाठी देखील सरकारकडून सबसिडी दिली जाते.  


'देशातील निसर्गरम्य परिसरात राहण्यासाठी तरुणांनी यावं आणि यातून इथली कोलमडलेली आर्थिक परिस्थिती बलशाली करण्यासाठी मदत व्हावी या हेतूने आम्ही ही योजना आखली आहे', असं सार्डिनियाचे राष्ट्राध्यक्ष क्रिस्टियन सोलिनास (Christian Solinas) यांनी सांगितलं आहे. देशातील अविकसीत भागाचा विकास हा अशा नवनवीन योजनांमुळे शक्य होऊ शकतो. असं देखील राष्ट्राध्यक्ष (President of Sardinia) म्हणाले.