मुंबई : आपल्या शरीरातील प्रत्येक भाग तसंच प्रत्येक अवयव आणि त्याचं कार्य आपल्याला माहिती असतं. मात्र तुमच्या शरीरातील एका भागाची तुम्हाला नक्कीच माहिती नसेल. शास्त्रज्ज्ञांनी नुकतंच आपल्या शरीरातील एका भागाचं संशोधन केलं आहे. ज्याची माहिती यापूर्वी कोणालाच नव्हती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संशोधकांनी शोधलेला हा भाग जबड्या जवळचा आहे. हा जबड्याच्या Masseter Muscle च्या खोल थरामध्ये आढळतो. Masseter Muscle जबड्याच्या खालील भागाला वर उचलतो आणि अन्न चावण्याच्या प्रक्रिेयेत महत्त्वाची भूमिका बजावतो. मॉडर्न एनाटॉमी पुस्तकात मास्सेटरच्या दोन स्तरांचा उल्लेख करण्यात आला आहे.


अॅनल्स ऑफ अॅनाटॉमी या सायन्स जर्नलच्या ऑनलाइन पेपरमध्ये हा शोध प्रकाशित करण्यात आला आहे. संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांच्या टीमने ऐतिहासिक ग्रंथांमध्ये लिहिलेल्या जबड्याच्या स्नायूंमध्ये लपलेला अवयव शोधण्यासाठी अभ्यास सुरू केला होता. 


यासाठी 12 व्यक्तींचे मृतदेह फॉर्मलाडेहाइडमध्ये जतन करण्यात आले होते. शास्त्रज्ञांनी शरीराच्या डोक्याचा अभ्यास केला तेव्हा त्यातून धक्कादायक निष्कर्ष समोर आला. प्राचीन ग्रंथात लिहिल्याप्रमाणे ठिकाणापासून दूर शरीराचा एक वेगळा भाग त्यांच्या दिसून आला.


जबड्याला स्थिर करत स्विझर्लंडमधील बेसल युनिवर्सिटीच्या बायोमेडिसिन विभागातील लेक्चरर आणि संशोधक स्जिल्विया मेजी यांनी सांगितलं की, हा स्तर जबड्याच्या खालच्या भागाला स्थिर करण्यासाठी मदत करतो. 


यूनिवर्सिटी ऑफ बेसल के सेंटर ऑफ डेंटल मेडिसिनचे प्रोफेसर जेन्स क्रिस्टोफ टर्प यांनी सांगितलं की, गेल्या 100 वर्षांत शारीरिक संशोधनात कोणतीही कसर सोडलेली नाही, त्यामुळे हा या शतकातील शोध मानला जाऊ शकतो.