एक केळं घेण्यासाठी लागली 520000000 रुपयांची बोली! यात असं आहे तरी काय?
Expensive Banana : एका केळीवर तब्बल 520000000 रुपयांची बोली लागली आहे. यामुळे हे केळ जगातील सर्वात महागडे केळ ठरलं आहे. जाणून घेऊय या केळीमध्ये असं काय खास आहे.
The most expensive banana in the world : केळी हे तसं स्वस्त फळ आहे. जगभरात सर्वत्र हे फळ सहज उपलब्ध होते. एका केळीची किंमत 52 कोटी आहे असं कुणी तुम्हाला सांगितले तर, विश्वास बसणार नाही. मात्र, एक केळं खरेदी करण्यासाठी तब्बल 520000000 रुपयांची बोली लागली आहे. हे केळ जगातील सर्वात महागडे केळं ठरलं आहे. कुठे झाला हा लिलाव ? या केळी मध्ये असं काय आहे जाणून घेऊया.
हे देखील वाचा.... 2025 वर्ष महाभयानक! बाबा वेंगा पेक्षा डेंजर आहे नास्त्रेदमसची भविष्यवाणी
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर असलेल्या एका नामांकित म्युझीयममध्ये या केळीचा लिलाव झाला. अनेक जण या लिलावात सहभागी झाले होते. एका भिंतीवर हे केळ चिटकवण्यात आले होते. हे केळ साध सुध नसून एक कलाकृती आहे. लिलावात 520000000 रुपयांची बोली लागलेले हे केळं प्रत्यक्षात एक खरखुर केळ नसून केळीचे पेटिंग आहे. 'द कॉमेडियन' टोपणनाव असलेले प्रसिद्ध व्हिज्युअल आर्टिस्ट मॉरिझियो कॅटेलन यांनी केळीचे हे अनोखे पेंटिंग बनवले आहे. एकूण सहा जणांनी या पेंटिगवर बोली लावली. चिनी क्रिप्टोकरन्सी उद्योजक जस्टिन सन यांनी सर्वाधिक म्हणजेच तब्बल 62 लाख डॉलर्सची बोली लावून हा लिलाव जिंकला. 62 लाख डॉलर्सची भारतीय रुपयांमध्ये किंमत 52.4 कोटी इतकी होते.
एका भिंतीवर टेपने हे केळीची ही विचित्र प्रतिकृती चिटकवण्यात आली होती. 20 नोव्हेंबरला या केळीचा लिलाव झाला. अनेक दिग्गज तसेच श्रीमंत व्यक्ती या लिलावात सहभागी झाल्याने आयोजकही आश्चर्यचकित झाले. क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म TRON चे संस्थापक सन यांनी हे विचित्र पेटिंग तिच्या सामान्य किंमतीच्या किंमतीपेक्षा चारपट जास्त किंमतीत विकत घेतली. यानंतर ही विचित्र कलाकृती जगभरात चर्चेचा विषय बनली आहे.
कॅटलिनने 2019 मध्ये मियामीमधील आर्ट बासेल येथे पहिल्यांदा आपली कॉमेडियन अशी ओळख करून दिली. त्यानंतर त्यांच्या दोन पेंटिग 1.20 आणि 1.50 लाख डॉलरमध्ये विकल्या गेल्या.यानंतर आता त्यांच्या या केळीच्या अनोख्या पेंटिंगचा रेकॉर्ड ब्रेक किंमतीत लिलाव झाला आहे.