बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य उलगडले, ना एलियन, ना व्हर्लपूल... `या` कारणामुळे गायब होत सर्व काही
बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य उलगडले आहे. येथे विमाने जहाजे गायब का होतात याबाबतची माहिती समोर आली आहे.
Bermuda Triangle : बर्म्युडा ट्रँगल (Bermuda Triangle) हे जगातील सर्वात रहस्यमयी ठिकाण आहे. अखेर बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य उलगडले आहे. बर्म्युडा ट्रँगलच्या कक्षेत येणारी विमाने, जहाजे तसेच इतक वस्तू गायब का होतात याचा खुलासा झाला आहे. आतापर्यंत शेकडो विमाने आणि जहाजे बर्म्युडा ट्रँगल मध्ये गायब झाली आहे. येथे एलियन असल्याचा देखील दावा केला जात आहे.
बर्म्युडा ट्रँगल बाबतची पहिली माहिती अशी मिळाली जगाला
गेल्या 100 वर्षांत 75 विमाने आणि 100 हून अधिक लहान-मोठी जहाजे बर्म्युडा ट्रँगलमध्ये गायब झाल्याची माहिती एका अहवालानुसार समोर आली आहे. बर्म्युडा ट्रँगलमध्ये 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ख्रिस्तोफर कोलंबसने बर्म्युडा ट्रँगल बाबतची पहिली माहिती जगाला दिली होती. बर्म्युडा ट्रँगलमध्ये घडलेल्या विविध आश्चर्यकारक घटना त्यांनी आपल्या विविध लेखांच्या माध्यमातून जगासमोर आणल्या.
बर्म्युडा ट्रँगल नेमका आहे कुठे?
मिररच्या रिपोर्टनुसार, बर्म्युडा ट्रँगल हा बर्म्युडाजवळील उत्तर अटलांटिक महासागरातील एक क्षेत्र आहे. बर्म्युडा ट्रँगल जवळ गेलेली अनेक जहाजे बेपत्ता झाली आहेत. त्रिकोणी आकाराच्या बर्म्युडा ट्रँगल क्षेत्रात एक भोवरा तयार होतो. हा भोवरा जहाजे, विमाने आणि मानवांना आपल्या कक्षेत ओढतो असा दावा केला जात आहे. तर, येथे एलियन्सचे अस्तित्व असून एलियन्सच विमाने, जहाजे गायह करत असल्याचा दावा अनेक जण करतात.
बर्म्युडा ट्रँगल मध्य नेमकं घडतं काय?
बर्म्युडा ट्रँगलच्या कक्षेत येणारी विमाने, जहाजे इतकच काय तर माणसं देखील गायब होतात. येथे नमेकं काय घडतं याचा रहस्य उलगडण्याचे अनेक वर्षांपासून प्रयतेन सुरु आहेत. अखेर हे रहस्य उलगडल्याचा दावा केला जात आहे. चॅनल 5 डॉक्युमेंट्री - 'सिक्रेट्स ऑफ द बर्म्युडा ट्रँगल' मध्ये बोलताना खनिज तज्ञ निक हचिंग्स यांनी अनेक दावे केले आहेत. बर्म्युडा हा समुद्र पर्वत आहे. याच्या पाण्याखाली ज्वालामुखी आहे. 30 दशलक्ष वर्षांपूर्वीं हा ज्वालामुखी सक्रिय होता. परंतु आता तो नष्ट झाला आहे. फक्त ज्वालामुखीचा वरचा भाग शिल्लक आहे. याचे नमुने तपासले असता यात मॅग्नेटाइट आढळले आहे. हा पृथ्वीवर नैसर्गिकरित्या आढळणारा सर्वात चुंबकीय पदार्थ यामुळेच बर्म्युडा ट्रँगलच्या कक्षेत येणारी विमाने, जहाजे आपल्याकडे खेचून घेत असल्याचा दावा केला आहे.