मुंबई : आजही संपूर्ण जगात अशी अनेक रहस्यं आहेत की, त्या सर्वांबद्दल आजपर्यंत आपल्याला माहिती होऊ शकलेली नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रहस्याबद्दल सांगणार आहोत जे गेल्या 300 वर्षांपासून जगासाठी एक रहस्य बनलंय. आम्ही अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये उपस्थित असलेल्या रहस्यमय सावल्यांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या सावल्यांमुळे लोकं हैराण झाले आहेत. याठिकाणी काही विचित्र सावल्या दिसल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा या सावल्या आकाशात उडताना दिसतात. या सावल्या एखाद्या व्यक्तीप्रमाणे दिसतात. काही क्षण समोर राहिल्यानंतर अचानक गायब होतो. गेल्या 300 वर्षांपासून या डोंगरावर येणाऱ्या लोकांना या सतत पाहायला मिळत आहेत.


कॅलिफोर्नियाच्या पर्वतरांगांवर दिसणार्‍या या सावल्यांना डार्क वॉचर्स म्हणतात. या सावल्या किंचित अस्पष्ट आहेत. ज्याची लांबी सुमारे 10 फूट आहे. हे गडद वॉचर्स बहुतेक टोपी असलेले आणि जॅकेट घातलेले दिसतात. सहसा या सावल्या दुपारी किंवा नंतर अंधार होईपर्यंत दिसतात.


सांता लुसिया पर्वताच्या डोंगरावर दिसतात


गेल्या 300 वर्षांपासून कॅलिफोर्नियातील सांता लुसिया पर्वतरांगांमध्ये गिर्यारोहण करणाऱ्या लोकांनी या सावल्या पाहिल्याचं म्हटलं जातं. 


संशोधक काय म्हणतात


संशोधक असंही मानतात की, ही सावली पर्वत, प्रकाश आणि ढगांच्या स्थितीमुळे आहे. ज्याला लोक डार्क वॉचर्स म्हणू लागलेत. हे दुपारच्या वेळी दिसतं कारण सूर्याची स्थिती अशी होते की, सावल्या तयार होऊ लागतात.