मुंबई : मृत्यूनंतर काय होतं आणि मृत्यूपूर्वी लोकांना कसं वाटतं. आत्तापर्यंत अनेकांनी मृत्यूपूर्वी आणि नंतरचं अनुभव शेअर केले आहेत. याबाबत आता एका नर्सने धक्कादायक खुलासा केला आहे. मरणासन्न व्यक्तीला मृत्यूपूर्वी कसं वाटतं, तो काय पाहतो आणि काय विचार करतो हे नर्सने सांगितले. लोकांना मृत्यूदरम्यान आलेल्या अनुभवाबाबत नर्सने मोठा खुलासा केला आहे.


नर्सने अनेक व्यक्तींचे शेवटचे क्षण पाहिलेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉस एंजेलिसमधील नर्स ज्युली मॅकफॅडनने तिचे अनुभव सोशल मीडियावर शेअर केले. ही नर्स आयसीयूमध्ये काम करते. नर्सने सांगितलं की, ती दररोज लोकांना मरताना पाहते. मृत्यूची वेळ जवळ आल्यावर लोकांना कसं वाटतं हे त्यांनी सांगितले. 


ज्युलीने स्पष्ट केलं की, बहुतेक लोक सहसा मरण्यापूर्वी आय लव्ह यू असं म्हणतात किंवा ते त्यांच्या पालकांना हाका मारतात, जे आधीच स्वर्गवासी असतात.


मरणासन्न व्यक्तीला या गोष्टी दिसतात


नर्स ज्युलीने सांगितलं की, एखादी व्यक्ती सामान्यतः मृत नातेवाईक, प्रिय व्यक्ती, मित्र किंवा पाळीव प्राणी मृत्यूच्या एक महिना किंवा काही आठवडे आधी दिसू लागतात. ते त्या व्यक्तीला शारीरिकदृष्ट्या दृश्यमान असतात. ते एकतर त्यांच्याशी बोलतात किंवा त्यांच्याकडे टक लावून पाहतात. जेव्हा रुग्णाला विचारलं जातं की, तो काय पाहत आहे, तो त्याच्या नातेवाईकांचा उल्लेख करतो.


यासोबतच नर्सने सांगितलं की, व्यक्तीच्या शेवटच्या क्षणी श्वासोच्छवासात बदल, त्वचेचा रंग बदलणं, ताप येणं ही लक्षणं दिसू लागतात.