Land of the Midnight Sun : हिवाळ्यात दिवस छोटा आणि रात्र मोठी असते. मस्त थंडीमध्ये रजाई घेऊन झोपण्यात मजा काही औरच असते. पण जगाच्या पाठीवर एक अशा देश आहे, जिथे दिवस भला मोठा आणि रात्र अगदी 40 मिनिटांची असते. दिवसभर थकून आल्यानंतर रात्री किमान 6 ते 7 तास झोप झाली की, अख्खा दिवसाचा थकवा नाहीसा होऊन दुसऱ्या दिवसासाठी आपण तर उत्साही असतो. पण जर रात्र फक्त 40 मिनिटांची असेल तर...हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल ना.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगाच्या पाठीवर दिवस आणि रात्रीची वेळ हे सर्वत्र वेगवेगळी असते. जर आपण भारत आणि अमेरिकेच्या घड्याळ्यांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यामध्येही खूप फरक आहे. साधारण काही ठिकाणी दिवस खूप मोठा असतो तर काही ठिकाणी रात्र खूप मोठी असते. पण जगाच्या पाठीवर अशा देश आहे, जिथे सूर्य मध्यरात्रीनंतर मावळतो आणि थोड्याच वेळात पुन्हा उगवतो.


जगातील एकमेव देश!


होय! हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असतं, पण हे अगदी खरं आहे. या देशाचे नाव नॉर्वे आहे, जिथे फक्त 40 मिनिटंच रात्र असते. म्हणून हा देश 'लँड ऑफ द मिडनाइट सन' असेही म्हणतात. इथे रात्री सुमारे 12:43 वाजता सूर्यास्त होतो आणि 40 मिनिटांनी म्हणजेच रात्री 1:30 वाजता सूर्य पुन्हा उगवतो. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास इथे तुम्हाला पक्षांची किलबील ऐकायला मिळेल. हे असे एक-दोन वेळा होत नाही तर वर्षातील अडीच महिने या देशात असं चित्र असतं.. मे आणि जुलै दरम्यान सुमारे 76 दिवस इथे सूर्यास्त होत नाही.


 


हेसुद्धा वाचा - Knowledge : भारतातील एकमेव राज्य, जे 8 राज्ये आणि एका देशाच्या सीमेने वेढलंय; तुम्हाला माहितीये का नाव?


 


वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय कारणांमुळे...


अंतराळात सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी आपल्या कक्षेवर 365 दिवसांत सुर्याची एक कक्षा पूर्ण करतो. तसंच, ती 24 तासांत अक्षावर एक फेरी पूर्ण करतो. पृथ्वीच्या सूर्याच्या या प्रदक्षिणामुळे दिवस आणि रात्र होत असते. तेथे दिवस आणि रात्रीचा कालावधी नेहमीच सारखा नसतो. कधी दिवस मोठा असतो तर कधी रात्रा लहान असते, कधी दिवस लहान असतो तर रात्री मोठी असते. खरंतर हे पृथ्वीच्या अक्षाच्या झुकण्यामुळे होतं असतं. पृथ्वीचा कोणताच अक्ष असत नाही. पृथ्वी फिरत असताना एक उत्तर आणि दुसरा दक्षिणमध्ये बिंदू तयार होतात. या दोन्ही बिंदुंना सरळ रेषेत जोडले तर एक अक्ष तयार होतो. पृथ्वी आपल्या कक्षेतून 66 अंशांच्या कोनात फिरते. त्यामुळे तिचा अक्ष सरळ असत नाही तर तो 23 अंशाच्या कोनाच झुकलेला असतो. या अक्षाच्या झुकण्यामुळेच दिवस आणि रात्र लहान-मोठे होतात. 21 जून आणि 22 डिसेंबर या दोन दिवशी सुर्याची किरणे पृथ्वीच्या अक्षात झुकलेली असतात त्यामुळे पृथ्वी समान भागात पसरत नाही. साहजिकच दिवस आणि रात्रीच्या वेळांमध्ये फरक आहे. 


पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र


हा देश आर्क्टिक सर्कलजवळ आहे. यामुळे उन्हाळ्यात सूर्याची किरणे थेट या भागावर पडतात, त्यामुळे येथे सूर्यास्त फार कमी वेळात होतो आणि रात्र खूप कमी असते. त्यामुळे नॉर्वे हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. नॉर्वे उत्तर युरोप मध्ये स्थित आहे. याच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर, पूर्वेस स्वीडन, उत्तरेस फिनलंड व रशिया आहे. हा जगातील सर्वात समृद्ध देशांपैकी एक आहे. येथील सौंदर्य पाहण्यासारखे आहे. तुम्हालाही या ठिकाणी जाण्याचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही तुमच्या कुटुंबासह, मित्रांसोबत किंवा जोडीदारासोबत जाऊ शकता.