Pilot Catching Something From Window: रोजच्या धावपळीत आपल्या आजुबाजूला बऱ्याच घटना घडत असतात. काही घटनांचे आपण स्वत: साक्षीदार असतो. कधी कधी आपला त्या गोष्टींवर विश्वास बसत नाही. पण व्हिडीओ पाहिले की विश्वास ठेवावा लागतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत विमानातील पायलट कॉकपिटच्या खिडकीतून बाहेर डोकावताना दिसत आहे. इतकंच हात लांबवून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत आहे. यामागे काय कारण असा प्रश्न फोटो पाहिल्यावर पडतो. मीडिया रिपोर्टनुसार, साउथवेस्ट एअरलाइन्सची संबंधित ही घटना आहे. हा प्रकार लॉस एंजेलिसच्या लाँग बीच एअरपोर्टवर घडला. चला जाणून घेऊयात नेमका काय प्रकार घडला आहे. 


लॉस एंजेलिसच्या लाँग बीच एअरपोर्टवरील घटना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साउथवेस्ट एअरलाइन्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं आहे की, 'एक प्रवासी आपला फोन खाली विसरला होता आणि हा फोन त्याच्यापर्यंत पोहोचवण्याासाठी अशा पद्धतीने मदत केली.' 



कॉकपिटच्या खिडकीतून पायलट बाहेर डोकावला


व्हिडीओत पाहू शकता की, पायलट कॉकपिटच्या खिडकीतून बाहेर वाकला आहे आणि कर्मचारी उडी मारून स्मार्टफोन त्याच्या हातात देण्याचा प्रयत्न करत आहे. एक दोन उड्या मारून फोन देता आला नाही त्यामुळे दुसऱ्या कर्मचाऱ्याने फोन हातात घेऊन उडी मारली आणि पायलटच्या हातात दिला.


बातमी वाचा- Video: सलग 12 दिवसापासून मेंढ्या धावताहेत रिंगणात! त्यांच्या कृतीने आश्चर्याचा धक्का


हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 8 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 13 नोव्हेंबरला पोस्ट केलेला या व्हिडीओखाली युजर्स आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.