Trending News: चोराने जर काही धागेदोरे मागे सोडलं नाही तर, पोलिसांना त्यांना शोधायला खूप कठीण जातं. अशावेळी ते वेगवेगळ्या अनोख्या गोष्टी करुन त्या चोरांचा शोध घेतात. क्राइम पेट्रोल या टीव्हीवरील कार्यक्रमात आपण पोलिसांनी छडा लावलेल्या अनेक गुन्हेगाऱ्यांच्या स्टोरी बघितल्या आहेत. चीनमध्ये पोलिसांनी पकडलेल्या चोरीचं प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आता तुम्ही म्हणाल की, त्यात येवढं काय. पण यातच गंमत आहे सगळी. पोलिसांनी चोराला पकडण्यासाठी जी शक्कल येवढी ती ऐकून तुम्हाला आर्श्चयाचा धक्का बसेल. 


काय होती पोलिसांची शक्कल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमध्ये एका घरात घरफोडी झाली होती. आता पोलिसांना या चोरांचा शोध लावायचा होता. पोलिसांनी चोराबद्दल पुरावे जमविण्यासाठी घराची कसून तपासणी केली. पण चोरांनी चोरी केल्यानंतर कुठलाही पुरावा मागे सोडला नव्हता. मग पोलिसांसमोर प्रश्न निर्माण झाला की, आता या चोरांचा शोध कसा घ्यायचा. घराची तपासणी सुरु असताना लिव्हिंग रुमच्या भिंतीवर त्यांना दोन मेलेले डास दिसले. या डासांचे रक्त भिंतीला लागले होते. पोलिसांनी शक्कल लढवली त्यांनी या रक्ताचे नमुने घेते आणि ते डीएनए चाचणीसाठी पाठवले.


नूडल्स आणि अंड्यांवर मारला ताव


ही घटना चिनमधील फुझियान प्रांतातील फुझोऊ या ठिकाणी घडली आहे. 1 जून रोजी बंद घरात चोर बाल्कनीतून घरात शिरले. त्यांनी चोरांनी लाख मोल्याच्या वस्तू लंपास केल्या. पोलिसांच्या तपासात असं लक्षात आलं की, हे चोर त्या घरात एक रात्र राहिले सुद्धा आहे. कारण स्वयंपाक घरात उरलेले नूडल्स आणि अंड्यांचे कवच तपासात आढळून आले. तसंच बेडरुममध्ये ब्लॅकेटचा वापर झाल्याचंही तपासात दिसून आलं. 


असा लागला छडा


पोलिसांनी ज्या दोन डासांचे रक्त डीएनएसाठी पाठवले होते त्या आधारे पोलिसांनी 19 दिवसात चोरांना गजाआड केले. या तपासणीनुसार डीएनए चाई नावाच्या चोराशी जुळला आणि पोलिसांनी या चोराला 30 जून रोजी आपल्या ताब्यात घेतलं. या चोराने पोलिसांच्या तपासात इतर चार चोरांची कबुली दिली. पोलिसांनी ज्या मेलेल्या डासांचं रक्त तपासणीसाठी पाठवलं होतं. त्या डासांनी या चोराचा चावा घेतला होता. तर या मेलेल्या डासांनी पोलिसांनी चोराला गजाआड करण्यास मदत केली. पोलीस, चोर आणि मेले डास यांची कहाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.