YouTube वरील हा VIDEO, 5.50 कोटी रुपयांना विकला, 800 मिलियन Views
युट्यूबवर एक व्हिडिओ आहे ज्यात लहान मुलगा आपल्या मोठ्या भावाचं बोट चावत आहे. या व्हिडिओला युट्यूबने नेहमीसाठी काढून टाकले आहे
युट्यूबवर एक व्हिडिओ आहे ज्यात लहान मुलगा आपल्या मोठ्या भावाचं बोट चावत आहे. या व्हिडिओला युट्यूबने नेहमीसाठी काढून टाकले आहे. व्हिडिओ नॉन फंजिबल टोकनच्या रुपात विकन्यात आले आहे. NFT एक क्रिप्टोग्राफिक टोकन आहे. जे ऑनलाईन उपलब्ध आहे. जर कोणाकडे युनिक कन्टेंट आहे तर त्याचा कन्टेंट एनएफटीच्या रुपात विकता येतो. या मुलाच्या व्हिडिओचा लिलाव 5.5 कोटी रुपयांना झाला आहे.
55 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये 2 भाऊ दाखवण्यात आले आहेत. हा व्हिडिओ 2000 सालचा आहे. व्हिडिओला आतापर्यंत 800 मिलियन views आले आहेत. आता या व्हिडिओला मोठी रक्कम मिळणार आहे. व्हिडिओ सध्या युट्यूबवर उपलब्ध आहे परंतु लवकरच तो काढण्यात येणार आहे.
व्हिडिओचं नाव चार्ली बिट माय फिंगर आहे. त्याचा लिलाव आतापर्यंत जगातील 11 देशांमध्ये करण्यात आला आहे. शेवटच्या राऊंडमध्ये 3 fmusic या व्हिडिओला ओरिजनल राइट्स मिळाले. एनएफटी ही ब्लॉकचैन टेक्नॉलॉजी आहे.
55 सेकंदाच्या या व्हिडिओच्या लिलावात मोठी रक्कम मिळाली आहे. या व्हिडिओत एका भावाचे नाव चार्ली तर दुसऱ्याचे नाव हॅरी आहे. हॅरी आपल्या लहान भावाच्या तोंडात बोट टाकतो तर चार्ली त्याला चावतो. परंतु हॅरीला काही होत नाही. दुसऱ्यांदा इतक्या जोरात जावा घेतो की, दुखण्यामुळे हॅरी रडाय़ला लागतो.
हा व्हिडिओ युट्यूबर कोट्यावधी लोकांनी पाहिला आहे. लिलावाबाबत कुटूंबाने म्हटले आहे की, दोन्ही भावंड कॉलेज फंडसाठी या पैशांचा वापर करतील.