VIDEO : हार्मोनियमवर इंग्रजी गाण्यासोबत `बलम पिचकारी..`चं फ्युजन ऐकून थिरकले लंडन
लंडन: संगीताला ना भाषेचं बंधन असतं ना संस्कृतीचं. भारतामध्ये अभिजात शास्त्रीय संगीताचा वारसा आहे. लंडनमध्ये एका चिमुकल्याने हार्मोनियमवर चक्क बॉलिवूड आणि इंग्रजी गाण्याचा मिलाफ घडवून आणला. हा प्रयोग पाहून स्थानिकांनीही त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
द वॉइस किड्स यूके 2018 मध्ये कमाल
लंडनमध्ये द वॉइस किड्स यूके 2018 मध्ये कृष्णा या चिमुकल्याच्या ऑडिशनची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कृष्णा हा 10 वर्षीय मुलगा स्पर्धेमध्ये ब्लाईंड ऑडिशनमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळेस हार्मोनियमवर त्याने लोकप्रिय इंग्रजी गाणं 'हाउ डीप इज युअर लव'या गाण्याने सुरूवात केली. कृष्णाने स्वतः या गाण्यासोबत हार्मोलियम वाजवली. त्यानंतर या गाण्यामध्ये ' बलम पिचकारी' हे गाणं गुंफलं. हा मिलाफ ऐकून त्याच्यासमोर बसलेले जजचे पॅनल आश्चर्यचकित झाले. उपस्थित प्रेक्षकांसोबतच तिन्ही जज या गाण्यावर थिरकले.
कृष्णाची कमाल
अवघ्या 10 वर्षीय कृष्णाची तयारी पाहून तिन्ही परिक्षक भारावले होते. त्यांनी हार्मोनियम वाद्याबाबत माहिती विचारली. स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यावरही कृष्णाने त्याच्या साथीदारांसोबत 'समथिंग जस्ट लाइक धीस' हे गाणं हार्मोनियमच्या साथीने सादर केले.