Viral Video :  टेक्नॉलॉजीमुळे अनेक गोष्टी सहज आणि सोपल्या झाल्या आहेत. अनेक ठिकाणी प्रत्यक्षात हजेरी लावणे शक्य नसते. अशावेळेस फोनवरुन  ऑनलाईन सहभागी होता येते. मात्र, लहानशी चूक देखील महागात पडू शकते. असचं काहीसं एका महिलेसह घडंल आहे. ही महिला अंघोळ करत करत फोनवरुन अत्यंसंस्कारात ऑनलाईन सहभागी झाली होती. अचानक व्हिडिओ LIVE स्ट्रीम झाला. यामुले एखच खळबल उडाली. लंडनमध्ये ही विचित्र घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेट्रो यूके याबाबतचे वृत्त दिले आहे. उत्तर लंडनमध्ये हा प्रकार घडला आहे. येथे जे लोक या अंत्यसंस्कारासाठी येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी झूम व्हिडिओ कॉलची व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाते. या महिलेच्या परिचयाच्या व्यक्तीचे वयाच्या 48 व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले. मात्र, या महिलेला प्रत्यक्षात अत्यंतसंस्कारासाठी उपस्थित राहणे शक्य नव्हते. यामुळे ही महिला अंत्यविधीसाठी ऑनलाईन सहभागी झाली.


अत्यंतविधी सुरु असताना अंधोळीचा व्हिडिओ लाईव्ह झाला


झुम कॉलद्वारे महिला या अत्यंविधीच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. महिलेसह अनेकजण या अंत्यविधीमध्ये ऑनलाईन सहभागी झाले होते.  व्हिडिओ कॉल सुरु झाल्यानंतर महिलेने ऑडिओ आणि व्हिडिओ म्यूट केला. यानंतर महिला अंघोळीला गेली. यावेळी  अचानक व्हिडिओ LIVE स्ट्रीम झाला. महिलेच्या हे लक्षात आले नाही. एकीकडे अत्यंविधीचा व्हिडिओ दिसत असत होता तर दुसरीकडे महिला अंघोळ करतानाचा व्हिडिओ एका विंडोमध्ये दिसत होता. अत्यंविधीच्या कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थित असेलल्या अनेकांच्या निदर्शनास ही बाब आली.


अंघोळ करतानाचे LIVE स्ट्रीम व्हायरल


अत्यंविधीसाठी ऑनलाईन सहभागी  झालेल्यांसह  चर्चमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनी या महिलेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ पाहिला. यानंतर तात्काळ या महिलेला सूचित करण्यात आले. मात्र, तो पर्यंत या झूम कॉलचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओचे स्क्रीन शॉट देखील व्हायरल झाले आहेत.