Saudi Arabia उभी राहतेय जगातील पहिली नॉन-प्रॉफिट सिटी, अधिक जाणून घ्या
Saudi Arabia News: सौदी अरेबिया सरकार जगातील पहिली नॉन-प्रॉफिट सिटी बनवणार आहे.
मुंबई : Saudi Arabia News: सौदी अरेबिया सरकार जगातील पहिली नॉन-प्रॉफिट सिटी बनवणार आहे. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (Mohammed bin Salman) यांनी गेल्यावर्षी ही घोषणा केली होती. सरकारने या नॉन-प्रॉफिट शहराचा (Non-Profit City) मास्टर प्लानही जारी केला आहे. तरुणांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी या शहरामध्ये अनेक मनोरंजक गोष्टी आणि विविध वैशिष्ट्ये असणार आहेत.
हे शहराचे नाव असेल
या शहराचे नाव प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (Prince Mohammed Bin Salman) शहर असेल. हे शहर मानव-केंद्रित, प्रगत डिजिटल महानगर, शाश्वत आणि पादचाऱ्यांसाठी अनुकूल असेल. त्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे 44 टक्के ग्रीन ओपन स्पेसचे वाटप केले जाईल.
'मॉडेल म्हणून काम करणार'
Non-Profit Cityचे मुख्य कार्यकारी डेव्हिड हेन्री यांनी स्पष्ट केले की नाविन्यपूर्ण, शैक्षणिक आणि सर्जनशील उपक्रम विकसित करण्यासाठी एक प्रमुख इकोसिस्टम आणि जागतिक केंद्र स्थापन करुन सौदीतील तरुणांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचे या शहराचे उद्दिष्ट आहे. त्याचवेळी, हे शहर जागतिक स्तरावर Non-Profit क्षेत्राच्या विकासासाठी मॉडेल म्हणून काम करेल, असे सरकारचे म्हणणे आहे. हे युवक, स्वयंसेवी गट तसेच अन्य संस्थांना देखील आकर्षित करेल.
शहरात या सुविधा मिळणार
मोहम्मद बिन सलमान फाऊंडेशनने Non-Profit Cityविषयी माहिती देताना सांगितले की, या शहराच्या सीमा पश्चिम रियाधमधील सुमारे 3.4 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापतील. हे शहर नाविन्यपूर्ण, उद्योजकता आणि ना-नफा कार्यात भविष्यातील नेते तयार करण्यात मदत करेल. मास्टर प्लॅनमध्ये मनोरंजन, खाद्यपदार्थ, 6,000 अपार्टमेंट, 500 व्हिला आणि टाउनहाऊससह किरकोळ विक्रीची दुकाने, फूड, रिटेल शॉप यांचाही समावेश आहे. शहरात शैक्षणिक, महाविद्यालय, शाळा, कॉन्फरन्स सेंटर, सायन्स म्युझियम, क्रिएटिव्ह सेंटर अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत.
जगभरातून व्यावसायिक येतील
क्राउन प्रिन्स यांनी म्हटल्याप्रमाणे, त्याच्या फाउंडेशनचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करणारे हे अशा प्रकारचे पहिले ना-नफा शहर असेल. 'मोहम्मद बिन सलमान मिस्क' फाउंडेशनचे उद्दिष्ट ना-नफा तत्वावर कार्य इत्यादी परिभाषित करुन नाविन्य, उद्योजकता आणि भविष्यातील योग्य लीडर्सना प्रोत्साहित करणे आहे. जगभरातील व्यावसायिकांना येथे बोलावून त्यांना नवीन शोध लावण्यासाठी प्रेरित केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.