मॉस्को : जगातील सर्वात मोठं विमान १४,१०,००० पौंड वजनाचं आहे. 


अॅँटोनोव एएन-२२५


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगात फक्त एकच विमान चार रशियन रणगाडे, एक आख्खी ट्रेन किंवा ५० कार वाहून नेऊ शकतं. या विमानाला सहा ईंजिन आहे. याच्या पंखाची लांबी २९० फूट इतकी प्रचंड आहे. (ही जवळपास फूटबॉलच्या मैदानाएवढी आहे) या अशा अवाढव्य आणि शक्तीशाली विमानाचं नाव आहे, "अॅँटोनोव एएन-२२५".


रशियन बनावट


याची खासियत म्हणजे हे विमान मुळात रशियन अंतराळयान वाहून नेण्यासाठी १९८० सालात निर्माण केलं गेलं होतं. या विमानाला "म्रिया" हेसुद्धा नाव आहे. याचं वजन तब्बल ६६१ टन आहे तर लांबी २७६ फूट आहे. 


स्ट्यचू ऑफ लिबर्टीशी तुलना


या विमानाच्या भव्यतेची तुलनाच करचायची तर ती अशी करता येईल की स्ट्यचू ऑफ लिबर्टी च्या तिप्पट वजन आणि एखाद्या स्कूल बसच्या लांबीच्या सहापट लांब.