मुंबई : Why Biscuits Have Holes : क्रिस्पी, टेस्टी आणि बिस्किट खाणे प्रत्येकालाच आवडतं. चहासोबत बिस्किट खाणं प्रत्येकालाच आवडतं. बिस्किटांचा हजारो करोडोंचा व्यवसाय आहे. अनेक फ्लेवर्स आणि वेगवेगळ्या पद्धतीचे बिस्किट बाजारात उपलबंध आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांना देखील बिस्किट आवडतात. डायबिटीज रुग्णांकरता देखील खास बिस्किट बाजारात उपलब्ध आहेत. चॉकलेट ते नानकटाईपर्यंत सगळेच पदार्थ पसंतीचे आहेत. 


फ्लेवर ते डिझाइनपर्यंत सगळचं वेगळं 


या बिस्किटमध्ये डिझाइन ते फ्लेवर सगळंच वेगळं असतं. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का? की बिस्किटात छेद का असतात?  (Why biscuits have holes?)


अनेक गोड आणि सॉल्टी बिस्किटात छेद का असतात? अनेकांना असं वाटतं की, छेद किंवा छिद्र हे त्याच्या डिझाइनकरता आहे. पण हे छिद्र डिझाइनकरता नाही तर खास कारणाकरता असते. 


या छिद्राला डॉकर्स असे म्हटले जाते. छिद्र असण्यामागे प्रमुख कारण असते. बिस्किट बनवताना त्यामध्ये हवा पास व्हावी याकरता त्यामध्ये छिद्र असतात. यामुळे बिस्किट फुगत नाही. 


बिस्किटांमध्ये छिद्र असण्यामागे काय आहे वैज्ञानिक कारण 


बिस्किटे बनवण्याआधी मैदा, साखर आणि मीठ एका पत्र्यासारख्या ट्रेवर पसरवून मशीनखाली ठेवले जाते. यानंतर हे यंत्र त्यांना छिद्र पाडते.


या छिद्रांशिवाय बिस्किट नीट बनवता येत नाही. बिस्किटे बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान, त्यात थोडी हवा भरली जाते, जी ओव्हनमध्ये गरम करताना गरम झाल्यामुळे फुगते. त्यामुळे बिस्किटाचा आकार जसजसा मोठा होत जातो तसतशी डिश विस्कटायला लागते.