लंडन : ब्रिटनमध्ये नव्याने आढळून आलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रकारावर जगभरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जगभरातील नागरीक हाच विचार करीत आहेत, हा कोरोनाचा आक्रमक व्हायरस आपल्या देशात पसरला तर काय होईल. पण जागतिक आरोग्य संघटनेने या नव्या व्हायरसविषयी जे म्हटलं आहे, त्यावरुन घाबरण्याचं कारण नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालपासून ग्रेट ब्रिटनच्या प्रवासावर जगातील जवळ जवळ बहुतेक देशांनी बंदी लावली आहे. ब्रिटनहून प्रवासाला आतापर्यंत ४० देशांनी बंदी लावली आहे. यात युरोपातील संघ एक कॉमन पॉलिसी बनवण्यावर विचार करीत आहे.


डेन्मार्कमध्ये देखील एका नव्या कोरोना व्हायरसचं प्रकरण समोर आलं आहे. ज्यात स्वीडनने डेन्मार्कहून प्रवास करण्यास बंदी लावली आहे.


व्हायरसचा एक नवा जास्त वेगाने संक्रमण फैलावणारा आहे, पण तो अनकंट्रोल आहे, असं नाही. तो कंट्रोल होण्यासारखा आहे.


एकीकडे ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी लावणाऱ्या देशांची लिस्ट वाढत आहे. दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने , (डब्ल्यूएचओ) या नवीन व्हायरसशी संबंधित एक नवी गोष्ट सांगितली आहे.


डब्ल्यूएचओचे एमरजन्सी चीफ माईक रायन यांनी म्हटलं आहे की, कोरोनाच्या साथीत असा नवा स्ट्रेन मिळणे, ही एक सामान्य बाब आहे, पण तो अनकंट्रोल आहे, असं नाही. पण या आधी ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी या नव्या व्हायरससाठी अनकंट्रोल हा शब्द वापरला होता.



काही देश दक्षिण आफ्रिकेहून येणाऱ्या लोकांवरही बंदी लावत आहेत. कारण तेथे देखील कोरोना व्हायरस आणखी एक प्रकार मिळाला आहे, जो ब्रिटनच्या व्हायरसपेक्षा वेगळा आहे.