मुंबई :  कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारत संकटात सापडला आहे. दरम्यान, जगभरातील नामांकित कंपन्या आणि उद्योगपती भारताला मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. या मालिकेत Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी भारताला मदतीची घोषणा केली आहे. कुक यांनी ट्विट केले की, भारतात कोविड-19 चे रुग्ण वाढत आहेत. आमच्या संवेदना वैद्यकीय कर्मचारी, Apple परिवार आणि या महामारीशी संघर्ष करणाऱ्यांसोबत आहे. Apple ग्राउंडवर सपोर्ट आणि दिलासा देण्यासाठी काम करेल.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील कोविड -19 ची दुसरी लाट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सोमवारी भारतात कोरोनाचे 3.52 लाख नवीन रुग्ण वाढले. ही महामारी सुरू झाल्यानंतर एका दिवसातली ही सर्वात मोठी वाढ असल्याचे दिसून आले आहे.


यापूर्वी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी भारताला मदत करण्याचे वचन दिले होते.



नडेला यांनी ट्विट करत म्हटले होते की, 'सध्याच्या भारतातील स्थितीबद्दल मला अतिशय चिंता वाटते. अमेरिका सरकार मदतीसाठी पुढे आले याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. मायक्रोसॉफ्ट मदत आणखी वाढवण्यासाठी आपली ताकद, संसाधने आणि तंत्रज्ञानाचा वापर करेल. तसेच क्रिटिकल ऑक्सीजन कंस्ट्रेशन डिवाईस खरीदेसाठी मदत करेल.'


दरम्यान, सद्यस्थिती पाहता सुंदर पिचई यांनी ट्विट केले की, “कोविडचे संकट भारतामध्ये वाढत आहे हे पाहून फार चिंता वाटली. गुगल आणि गूगलर्स जोखीम असलेल्या समुदायांना मदत करणार्‍या संस्था गिव्ह इंडिया आणि युनिसेफला वैद्यकीय साहित्य पुरवठ्यासाठी 135 कोटी रुपये देत आहेत. याशिवाय आवश्यक माहितीच्या प्रसारासाठी अनुदान देण्यात येत आहे.''