अमेरिका आणि उत्तर कोरियाचा वाद, तिसऱ्या महायुद्धाची स्थिती
उत्तर कोरियाचा सनकी राजा किम जोंगने संपूर्ण जगाला आव्हान दिलं आहे. उत्तर कोरियाने रविवारी पुन्हा एकदा हायड्रोजन बॉम्बचं परीक्षण केलं आहे. उत्तर कोरियाच्या या हायड्रोजन बॉम्ब परीक्षणावर युएनमध्ये बैठक बोलावली गेली होती.
नवी दिल्ली : उत्तर कोरियाचा सनकी राजा किम जोंगने संपूर्ण जगाला आव्हान दिलं आहे. उत्तर कोरियाने रविवारी पुन्हा एकदा हायड्रोजन बॉम्बचं परीक्षण केलं आहे. उत्तर कोरियाच्या या हायड्रोजन बॉम्ब परीक्षणावर युएनमध्ये बैठक बोलावली गेली होती.
अमेरिकेने इशारा दिल्यानतंतर देखील उत्तर कोरियाने मिसाईल परीक्षण केलं. रविवारी उत्तर कोरियाने शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बचं परीक्षण केलं. या परीक्षणवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सोमवारी तातडीची बैठक बोलावली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला इशारा देत म्हटलं होतं की याचं गंभीर परिणाम होतील. याविरोधात उत्तर कोरियावर लष्करी कारवाई देखील होऊ शकते. तर चीन आणि रशियाला देखील उत्तर कोरियाविरोधात कारवाईसाठी ट्रम्प यांनी आवाहन केलं होतं. पण दोन्ही देशांनी ते नाकारलं होतं.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी म्हटलं आहे की, अमेरिका आणि उत्तर कोरियाचा वाद युद्धात बदलू शकतो. उत्तर कोरियावर दबाव वाढवला तर त्याचा वाईट परिणाम होईल. त्यामुळे चर्चेने मार्ग काढावा. अमेरिका जर उत्तर कोरियार कारवाई करतो तर मग चीन आणि रशिया उत्तर कोरियाच्या बाजुने उभे राहू शकतात. त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.