Third World War will start from here : जगभरात आतापर्यंत अनेक भविष्यवेत्ते होऊन गेले. बाबा वेंगा किंवा नॉस्ट्राडेमस यांनी केलेल्या भविष्यवाण्यांबाबत अनेक आकर्षणे आहेत. हजारो वर्षांनंतर भविष्यात काय घडू शकते याचा अंदाज त्यांनी बांधला. याबाबत भाकितं केली आहेत, ही भाकितं पुढे जाऊन खरी देखील ठरली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबा वेंगा किंवा नॉस्टरडॅमस यांनी हिटलरबद्दल, हिरोशिमा-नागासाकीबद्दल, अणुहल्ल्याबद्दल आणि महायुद्धाबद्दल अनेक भाकितं व्यक्त केले असतील, जी पुढे येणाऱ्या काळात खरी देखील ठरली. आगामी घडामोडी अगोदरच जाणून घेण्याच्या मानवी प्रवृत्तीमुळे अनेकांनी भविष्यकारांनी सांगितलेली भविष्य वाचायला आवडतात. अशीच एक भीतीदायक भविष्यवाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)ने केली आहे. chatGPTने अशा 6 ठिकानांची नावे सांगितले आहेत जेथून तिसरे महायुद्ध सुरु होऊ शकते. 


काही दिवसांपूर्वी ब्रिटीश आर्मी चीफ ऑफ स्टाफ जनरल स्टाफ पॅट्रिक सँडर्स आणि नाटो जनरल्स यांनी आपल्या नागरिकांना युद्धासाठी तयार राहण्यास सांगितले असते. तेव्हा लष्करप्रमुख म्हणाले होते, "नागरिकांना शस्त्रे उचलण्यासाठी सज्ज असायला हवे. कारण जेव्हा युद्ध सुरू होईल तेव्हा कदाचित रिझर्व्ह फोर्सदेखील पुरेसा नसेस. त्यांच्या या वक्तव्याने जगाला धडकी भरली होती. अशातच ChatGPT ने तिसऱ्या महायुद्धाच्या संभाव्य ठिकाणांबद्दल विचारले असता, त्याने6 हॉटस्पॉट सांगितले. डेली स्टारच्या वृत्तानुसार केवळ सहा ठिकाणेच तिसऱ्या महायुद्धाचे केंद्र बनू शकतात आणि कोणत्याही क्षणी संघर्ष सुरू होऊ शकतो.  


ही आहेत 6 केंद्रस्थान 


1. कोरियन द्वीपकल्प
2. मध्य पूर्व
3. तैवान सामुद्रधुनी
4. पूर्व युरोप
5. दक्षिण चीन समुद्र
6. भारत-पाकिस्तान सीमा


कोरियन द्वीपकल्प


उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेच्या सहभागामुळे परिस्थिती आणखी बिकट होत आहे. उत्तर कोरियाकडून नवीन क्षेपणास्त्रांची चाचणी सुरूच आहे. त्याला चीनसारख्या मोठ्या शक्तीचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे येथून कधीही मोठे युद्ध सुरू होऊ शकते.


मध्य पूर्व


मध्य पूर्व हा एक असा प्रदेश आहे जिथे अनेक दशकांपासून संघर्ष सुरू आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. यामध्ये इराण आणि त्याच्या शेजारी देशांच्या सहभागामुळे तणाव आणखी वाढला आहे. सध्या सीरियात गृहयुद्ध सुरू असून, अमेरिका आणि रशिया एकमेकांसमोर उभे आहेत. हा जागतिक संघर्ष कधीही बदलू शकतो.


तैवान सामुद्रधुनी


चीन आणि तैवानमधील तणाव सातत्याने नवनवीन रूप धारण करत आहे. नवे सरकार आल्यानंतर परिस्थिती बिकट होत चालली आहे. दरम्यान, परिस्थिती आणखी बिघडवण्याकडे अमेरिकेचा डाव आहे. आशिया-पॅसिफिक प्रदेशाचा हा भाग कधीही तिसरे महायुद्ध होऊ शकतो.


पूर्व युरोप


पूर्व युरोपातील प्रदेश चौथ्या क्रमांकावर येतात. रशिया, युक्रेन आणि नाटोशी संबंधित आश्वासनांमुळे पूर्व युरोपमध्ये तणाव वाढत आहे. हे कधीही मोठ्या संघर्षाचे रूप घेऊ शकते.


दक्षिण चीनी समुद्र


दक्षिण चीन समुद्राबाबत चीन आणि शेजारी राष्ट्रांमध्ये सतत वाद सुरू आहे. या वादात अमेरिकेसारख्या महासत्तेचे आश्वासन आगीत इंधन भरत आहे. अशा परिस्थितीत तणाव शिगेला कधीही पोहोचू शकतो आणि संघर्षाची परिस्थिती उद्भवू शकते. महायुद्धाची सुरुवात येथूनच होऊ शकते.


भारत-पाकिस्तान सीमा


भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक दशकांपासून तणाव आहे. सीमेवर गोळीबार सुरू आहे. दोनदा युद्धे झाले, पण त्यांचा देशाच्या इतर भागावर कधीही परिणाम झाला नाही. गेल्या 4 वर्षात शांतता आहे. असे असूनही, येथून जागतिक युद्ध सुरू होऊ शकते, असा विश्वास चॅटजीपीटीचा विश्वास आहे की येथूनही जागतिक युद्ध सुरु होऊ शकते. कारण दोन्ही देशांकडे आण्विक क्षमता आहे.